दिलीप लोखंडे
टाकळीभान - प्रतिनिधी - टाकळीभान येथील एका मागासवर्गीय तरुणास जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. चौघा विरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दिलेल्या फिर्यादीत संकेत सर्जेराव गायकवाड यांनी म्हटले आहे की, मी 18 मार्च 2025 रोजी 9 ते 9.15 वाजेच्या दरम्यान टाकळीभान येथील सप्तपदी मंगल कार्यालयाच्या समोरून मी माझ्या घरी जात असताना तेथे, कान्हा खंडागळे, तुषार पवार प्रशांत नागले राजू नागले सुनील जाधव व इतर दोन अनोळखी इसम माझ्या जवळ आले. त्यावेळी कान्हा खंडागळे हे मला म्हणाले की, कारे चमट्या जास्त शहाणा झाला काय, तू चांभार आहेस , तुझी आमच्यासमोर उभा राहण्याची लायकी नाही, तुमची चप्पल शिवायची लायकी आहे, तुला गावात राहू देणार नाही असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ केली तसेच तुषार पवार यांनी तलवार सारख्या वस्तूने माझ्या डोक्यात मारले व मी पळत असताना कान्हा खंडागळे यांनी माझ्या पाठीमागे येऊन पुन्हा तलवारी सारख्या वस्तूने मारले तसेच प्रशांत नागले राजू नागले सनी जाधव यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली व इतर दोन अनोळखी लोकांनी याला काय मारायचे ते मारा आपण पोलीस मॅनेज करू असे म्हणून त्यांनी व इतरांनी मला शिवीगाळ केली त्यानंतर मला कापसे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. सदर खरेदीच्या जबाबा वरून गुन्हा रजिस्टर 236/2025 भा. न्या.सं.क. कायदा कलम 189(1),189 (2),189 (4),190,191(2),118 (1) अनुसूचित जाती-जमाती, कायदा 'क ' 3, (1) आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी आरोपी कान्हा खंडागळे, तुषार पवार, प्रशांत नागरे,राजू नागले व इतर दोन इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा पुढील तपास श्रीरामपूर विभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे हे करीत आहे.
0 Comments