लोहगाव (वार्ताहर): राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयात बाभळेश्वर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे सहाय्यक विभागीय अधिकारी यशपाल भिकनराव पाटील यांच्या वतीने विद्यालयातील इयत्ता पाचवी वर्गातील विद्यार्थी सुजल देवेंद्र दळे यास सायकल भेट देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले तर प्राचार्य विनायकराव मेथवडे यांनी आपल्या मनोगतातून पाटील यांचे धन्यवाद व्यक्त केले. यावेळी उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, अनिल जाधव, नरेंद्र ठाकरे, वर्गशिक्षिका कुदळ, रमेश निकाळे, राजू गावित, बाबासाहेब अंत्रे, अनिल गोलवड, सविता दळे आदी जण उपस्थित होते. शेवटी संजय ठाकरे यांनी आभार मानले.
0 Comments