राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने जागतिक वसुंधरा दिनी वाहन विरहित दिवसाचा राज्यात पर्यावरण पूरक लक्षवेधी उपक्रम, एक हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेवून 8 लाख किलो कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन टाळले--



दिलीप शिंदे सोयगाव
    सोयगाव दि.22 - जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत पृथ्वीवरील वाढते जागतीक तापमान वाढ, हरित गृह वायू यावर जनमानसात जागृती व्हावी,वसुंधरा तथा भारत माते बद्दल स्नेह वृद्धी व्हावी, वृक्षांचे महत्व कळावे  या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सिल्लोड जिल्हा शाखेच्या वतीने "वाहन विरहित दिवस " हा उपक्रम राबविण्यात आला. संघाच्या जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील हजार हुन अधिक स्वयंसेवक व निसर्ग प्रेमी नागरिक यांनी कोणतेही दुचाकी व चार चाकी वाहन न वापरता पायी, सायकल व मोजक्या जणांनी लांबच्या प्रवासासाठी सार्वजनिक बस आदी वाहतूकिचा पर्याय निवडला.
          -उपक्रमाचे हरीत फलीत ---- एक दुचाकी सरासरी एका दिवसात 800 ग्राम कॉर्बन डाय ऑक्साईड हा  वातावरणास हानिकारक व तापमान वाढवणारा हरीत गृह वायू उत्सर्जित करते, त्या अर्थी एक हजार वाहनांतुन आठ लाख किलो कॉर्बन डायऑक्साईड निर्माण होणे थांबले व पृथ्वीचे रक्षण करण्याचे कार्य घडले. सोबतच नायट्रस ऑक्साईड, कॉर्बन मोनाक्सा ईड, मिथेन आदी हानिकारक वायू प्रदूषके यांचे लक्षावधी किलो उत्सर्जन थांबून खऱ्या अर्थाने " वंदे मातरम "म्हणजेच धरतीला नमन करण्यात आले. इंधन बचतही घडली. बऱ्याच जणांनी सायकलचा वापर केल्याने आरोग्यास उपकारक ही ठरले.
        -- संघाच्या अन्वी शाखे द्वारे  दुर्मिळ सुवर्ण पिंपळाचे व अधिक ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या व कॉर्बन वायू शोषणाऱ्या झाडांचे रोपण करण्यात आले. संघाच्या पर्यावरण- गतीविधी विभागाचे सह कार्यवाह व पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम जिल्हा कार्यवाह केतन कल्यानकर, गोरख मंडल,प्रचारक दिपक कुमार, अनिल काळे, धीरज राजपूत, अमोल ढाकरे,अमित कुलकर्णी, राजेंद्र चापे, संदीप शेवरे, ज्ञानेश्वर काळे आदींच्या नेतृत्वाखाली  राबविण्यात आला.

Post a Comment

0 Comments