शिर्डीला साई दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांसाठी साई संस्थानच्या वतीने उतरण्यात येणार पाच लाखाचा विमा!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीला साई दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांना यापुढे पाच लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार असून पाडव्याच्या मुहूर्तावर साई संस्थांनने हा निर्णय घेतला आहे. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडली तर पाच लाखांचा विमा संरक्षण संबंधित किंवा त्याच्या कुटुंबांना मिळणार आहे. या निर्णयामुळे साई भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.  
                     साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येणाऱ्या भाविकांचा श्री साईबाबा संस्थानने विमा उतरवावा तसेच शिर्डी व परिसरात अपघात झालेल्या भक्तांवर साईनाथ रुग्णालयात मोफत उपचार करावेत या मागणीचे जाहीर निवेदन आंतराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विक्रांत वाघचौरे यांच्या  नेतृत्वाखाली साईबाबा संस्थानचे मा कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल मॅडम यांना २०१८ साली देण्यात आले होते,
यामागणीस सतत पाठपुराव्यामुळे नुकतेच यश मिळाले असून श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे मा कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर  यांनी नुकतेच साईबाबा संस्थांनच्या वतीने सुरक्षित साईदर्शन संकल्पनेला मान्यता देऊन परगावाहून पायी येणाऱ्या साई भक्तांची आगाऊ नोंदणी करून त्यांचा सुमारे ५ लाखाचा विमा उतरवण्यात येणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले आहे, त्यामुळे साई भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.                       आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विक्रांत वाघचौरे यांनी वारंवार संस्थांनकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला व सदर अपघाती विमा व सुरक्षित साईदर्शन का ?  गरजेचे आहे याचे महत्व संस्थानप्रशासनाला समजावून सांगितले आहे,   साईभक्त अपघाती विमा, हॉस्पिटलमध्ये अपघात ग्रस्तांना मोफत उपचार, मंदिर परिसरात अपघात झाल्यास पूर्वी १० लोकांवरून ५० लोकांपर्यंत भरपाई व विमा देण्याची मागणी असे अनेक मागण्या प्रसाशानाकडून योग्य पाठपुरावा करून मान्य करून घेण्यास यश मिळाले आहे . असे वाकचौरे यांनी सांगितले.    दर्शनासाठी वर्षभर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, बऱ्याचदा दर्शन घेण्यासाठी येत असताना किंवा दर्शन घेऊन परतताना भाविकांसोबत छोट्या मोठ्या दुर्घटना घडतात. या पार्श्वभूमीवर साई संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. साईभक्तांना आता पाच लाखापर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय संस्थानकडून घेण्यात आला आहे. 
साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी म्हटले आहे की, जो भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहे, त्याच्यासाठी पाच लाखांचा विमा उतरवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यात अट अशी आहे की, जो भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येईल, त्यांनी दर्शनाला निघण्यापूर्वी साईबाबा संस्थानची ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे भक्त साईबाबांच्या दर्शनासाठीच येत आहे, याची ओळख पटण्यास मदत होईल. जे फक्त नोंदणी करून येतील, त्यांचा विमा उतरवला जाणार आहे. सर्व साई भक्तांना यानिमित्त मी विनंती करत आहे की, आपण निघण्यापूर्वी साईबाबा संस्थानच्या ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments