समर्पण फाउंडेशनने लोकसह भागातून केला आमखेडा भागातील रामजी नगर परिसर स्वच्छ--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.31-  सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथील रामजीनगर परिसरात अनेक दिवसांपासून कचरा साचल्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली होती. गावात घंटागाडीही नाही व कचरा व्यवस्थापनही झालेले नाही त्यामुळे नागरिकांना नाविलाजाने उघड्या जागी कचरा टाकावा लागतो. परंतु रोगराई व आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून समर्पण फाउंडेशनच्या पुढाकारातून तसेच रामजीनगर परिसरातील नागरिकांनी मिळून परिसरातील कचरा संकलन केले व जेसीबीच्या साह्याने खड्डा करून त्यामध्ये कचरा पुरण्यात आले. 

यावेळी 40 स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. रामजी नगर परिसरातून सोना नदी वाहते. उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडे झाल्यामुळे नदीपात्रात कचरा साठतो. त्यामुळे नदीचेही प्रदूषण होते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन झाले तर ही मोठी समस्या दूर होईल असे मत समर्पण फाउंडेशन ने सांगितले.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments