दिलीप लोखंडे
टाकळीभान- प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील रमजान निमित्ताने जामा मशीद या ठिकाणी आयपीएस अधिकारी रॉबिन बन्सल व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये रमजान निमित्ताने इफ्तार पार्टीचा कार्यक्रम घेण्यात आला,
यावेळी रॉबिन बन्सल, म्हणाली की , समाजकार्य चांगले करावे व युवकांनी समाजसेवा चांगल्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये व धार्मिक क्षेत्रामध्ये आपले नाव कमवा माझ्या तरुण मित्रांनो व्यसना पण दूर राहा जीवन एकदाच आहे त्याचा आपल्या जीवनामध्ये आनंद लुटा पण आपल्या मातापित्यांना कदाचित विसरू नका ,कारण त्यांनी आपल्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट केले आहेत ,
यावेळी जामा मशीदचे ट्रसचे अब्दुल देशमुख यांच्या हस्ते मुस्लिम समाजातील सर्व मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले
या इफ्तार कार्यक्रम प्रसंगी शिराज इनामदार, बशीर बेग, सलीम शेख, अनिल शेख, भैया पठाण सा, फौ, रवींद्र पवार पो, ना, संतोष कराळे बाब सय्यद सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सय्यद सर केले तर आभार हमीद देशमुख यांनी केले.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments