दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.24- रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला बोलेरो गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोयगाव तालुक्यातील बनोटी- पाचोरा रस्त्यावरील निंभोरा गावाजवळ दि.24 सोमवारी घडली.
अशोक पिरा म्हात्रे (वय 43)रा.निभोंरा (ता.सोयगांव) असे मृत तरुणाचे नाव आहे. अशोक म्हात्रे आणि मावस भाऊ निंभोरा येथून बनोटी कडे दुचाकीने (एम एच 19 डि वाय 3704) घरगुती कामाकरीता जात असतांना निंभोरा गावाच्या पुढे सरस्वती भुवन हायस्कूल जवळ काही आठवण आल्याने रस्त्याच्या कडेला थांबला होता तेवढ्यात हातातील मोबाईल रस्त्यावर पडला, मोबाईल उचलन्याकरीता खाली वाकला असता बनोटी कडुन पाचोराकडे जात असलेल्या भरधाव जाणार्या बोलेरो गाडी क्रमांक (एम एच 19 डि एफ 1377) दिलेल्या जोरदार धडकेत अशोकच्या डोक्याला जबर मार बसला आणि जमिनीवर कोसळला मावसभाऊ आणि ग्रामस्थ जमा होऊन बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता आरोग्य अधिकारी डॉ रब्बानी शेख यांनी तपासणी करून मृत घोषित केले. बनोटी दुरक्षेत्रात दिलेल्या फिर्यादीवरून उप निरीक्षक रज्जाक शेख, राजेंद्र बर्डे, श्रीकांत तळेगावकर, राजु बरडे, संदिप सुसर आदिंनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.दरम्यान बनोटी येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. निंभोरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्याचा पश्चात पत्नी,दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
0 Comments