श्री बिरोबा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट कडून डी एम चौधरी यांना समाज रत्न पुरस्कार घोषित
लोहगाव (वार्ताहर)
येथील वैकुंठवासी ह .भ. प. सजन यशवंत सदाफळ वैकुंठवासी भाऊसाहेब सजन सदाफळ यांच्या स्मरणार्थ
जगद्गुरु संत तुकाराम बीज महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन 16 मार्च 2025 रोजी राहता येथे 15 चारी उपनगर येथे आयोजन करण्यात आलेली असून
दरम्यान बीज किर्तन सेवा भागवत कथाकार विकास महाराज गायकवाड यांच्या सकाळी दहा ते बारा या वेळेत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनावर कीर्तन सेवा होणार आहे.
तदनंतर बाल कन्या संस्कृती सदाफळ हिचे संत तुकारामाचे जीवन पटावर माहिती सादर करणार आहे.
शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वमने व पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या हस्ते गोगलगांव येथील सामाजिक कार्यकर्ते बँक ऑफ बडोदा चे सेवानिवृत्त वरिष्ठ शाखा अधिकारी डी एम चौधरी यांचा समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाप्रसंगी ट्रस्टच्या वतीने उपस्थित भाविक यांना श्रीमद् भागवत गीता भेट देण्यात येणार आहे असे मार्गदर्शक बाळासाहेब गुळवे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .
दरवर्षी ट्रस्ट करून देण्यात येणारा हा पुरस्कार यावेळी ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी डी एम चौधरी यांना देण्यात आलेला आहे. त्याकाळात विविध समस्यांना सामोरे जात कठीण परिस्थिती समाजाची मदत मिळून शिक्षण घेऊन त्यांना समाजाची व ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी बँकिंग क्षेत्रात विशेष काम केले त्याचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे . त्यांचे या पुरस्कारासाठी निवड केल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष ॲड रामनाथ सदाफळ यांनी सांगितले.
0 Comments