बाभळेश्वर (वार्ताहर) राहाता तालुक्यातील बाभळेश्वर -लोणी रोडवरील प्रवरानगर फाट्याजवळील जागृत देवस्थान देवस्थान म्हसोबा महाराज यात्रा उत्सवाचे आयोजन उद्या बुधवार दि.12 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेले आहे.
त्यानिमित्ताने सकाळी ७ वा . बाभळेश्वर चौक ते म्हसोबा महाराज मंदिर पर्यंत श्री श्रेत्र पुणतांबा येथून आणलेल्या कावडीच्या पाण्याची मिरवणूक तसेच मानाच्या काठीची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर ८ वाजता म्हसोबा महाराज मूर्ती अभिषेक कार्यक्रम होईल.
.रात्री ७ वाजता श्रीरामपूर जिल्हा संघ ते म्हसोबा महाराज मंदिर पर्यंत ढोल ताशांच्या गजरात आरत्याची मिरवणूक होईल यावेळी करण्यात येणारी भव्य दिव्य आतिश बाजी हे खास आकर्षण असते तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी म्हसोबा यात्रा निमित्ताने आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्रीरामपूर जिल्हा संघ ,दत्तनगर ग्रामस्थ ,,बाभळेश्वर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.( सहयोगी बातमीदार प्रकाश औताडे बाभळेश्वर )
0 Comments