बाभळेश्वर येथे बाळ येशू श्रद्धास्थान येथे यात्रेचे आयोजन




बाभळेश्वर( वार्ताहर ) राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील यशवंत नगर येथे बाळ येशू श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी 24व्या यात्रा महोत्सवाचे आयोजन शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी६ वाजता करण्यात आलेले आहे.

यावेळी प्रमुख याजक  बिशप नाशिक कॅथोलिक धर्माप्रांत महागुरू स्वामी  रा.रे. डॉ. बार्थोल बरेटो. उपस्थित राहणार आहे.यावेळी उद्या बुधवार दि १२ रेव्हा फा. फ्रान्सिस ओहोळ हरेगाव यांचे बाळ येशू द्वारे देव पित्याची कृपा प्रगट झाली 

, गुरुवार दिनांक १३ रेव्हा.फा. सतीश कदम कोळपेवाडी यांचे बाळ येशू जगाचा तारणारा, शुक्रवार दिनांक १४  रेव्हा फा. प्रमोद बोधक नाशिक यांचे बाळ येशू आरोग्य दान देणारा यांची विदिन नोव्हेना भक्ती तीन दिवस सायंकाळी  ६ वाजता होणार आहे.यात्रेच्या दिवशी १५ फेब्रुवारीला बाळ येशूची सायंकाळी ५.१५वा मिरवणूक निघणार आहे सायंकाळी ६ वाजता पवित्र मिस्सा त्यानंतर रात्री ७.३०वा. महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी येशूच्या यात्रा महोत्सवानिमित्ताने उपस्थित राहावे असे आवाहन स्थानिक धर्मगुरू, धर्म भगिनी ,धर्मग्राम पाळकीय समिती, बाळ येशू महिला मंडळ बाळ येशू युवक मंडळ व धर्मग्रामातील सर्व ग्रामस्थांनी केले आहे.(सहयोगी पत्रकार औताडे प्रकाश बाभळेश्वर)


Post a Comment

0 Comments