शिर्डी ( प्रतिनिधी)
राहाता तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृध्दी 2.0 प्रशिक्षण उत्साहात पार पडत आहे.
प्राचार्य डा. राजेश बनकर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर,जिल्हा समन्वयक श्री.अरुण भांगरे,संपर्क अधिकारी डॉ.गणेश मोरे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)भास्कर पाटील,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडुस ,गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे,विस्तार अधिकारी विष्णु कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे.
हे पाच दिवशीय प्रशिक्षण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता 1 ली ते 12 वी ला अध्यापन करणा-या शिक्षकांसाठी दिनांक 10 फेब्रुवारी ते 7 मार्च 2025 या कालावधित प.डा.व्ही.व्ही.पा.वि.लोणी व कला, विज्ञान ,वाणिज्य महविद्यालय राहाता येथे आयोजित करण्यात आले आहे.तालुका समन्वयक श्री.सुनिल लोमटे सर यांनी उत्कृष्ट प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासकीय व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व शिक्षकांचे सक्षमीकरण केले जाणार असुन प्रशिक्षणात एकात्मिक दृष्टीकोनाच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ; राज्य अभ्यासक्रम आराखडा-शालेय शिक्षण ,राज्य अभ्यासक्रम आराखडा-पायाभूत स्तर,समग्र प्रगतीपत्रक,क्षमता आधारित मूल्यांकन,क्षमता आधारित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया ,क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यनिती,प्रश्ननिर्मितीचे प्रकार, क्षमता आधारित प्रश्ननिर्मिती कौशल्ये,उच्चस्तरीय विचारप्रवर्तक प्रश्न,शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा 2024-25 य विषयीचे मार्गदर्शन केले जात आहे.प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा दिनांक 24 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 या कालावधित कला,विज्ञान,वणिज्य महविद्यालय राहाता येथे आयोजित केला असुन प्रशिक्षणास सौ.धनश्रीताई सुजय विखे पाटील यांनी भेट देवून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तरतुदीचा अभ्यास करुन प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन करून प्रशिक्षणास शुभेच्चा दिल्या. सुलभक म्हणून तालुक्यातील सुनिल लोमटे,विजय देशमुख,सुरेश साबळे,नंदकिशोर भांड,सुर्यभान रहाणे,तुकाराम डापसे,बालाजी आईंदवाड,विवेक मोरे,सिध्दार्थ दिवे, दिनकर यादव,योगेश बांगर इत्यादीनी अतिशय उत्कृष्ट भुमिका पार पाडत आहेत.
(सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी)
0 Comments