दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.25- तालुक्यातील बहुलखेडा गावात तनाव प्रकरणी जमावात उभ्या असलेल्या बजरंग दलाचे गोरक्षक जिल्हा प्रमुख सचिन चौधरी यांना काठीने का मारहाण केली याचा जाब विचारण्यासाठी सोयगाव पोलीस ठाण्यात गेलेल्या जरंडी च्या आदर्श पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत च्या उपसरपंच संजय पाटील यांचेशी उद्धट पणे वागणुक देऊन पोलीस ठाण्यातून बाहेर व्हा असे संबोधल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या विरोधात मंगळवारी सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी सोयगाव पोलीस ठाण्याचे समोर चार तास ठिय्या करण्यात आल्या ने पोलीस ठाणे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजपचे कार्यकर्ते संजीवन सोनवणे हे चर्चा करीत असताना पोलीस उपनिरीक्षक आरेकर यांनी आम्ही का उपटायला होता का? अशा अभद्र शब्दाचा वापर केल्याने उपस्थितांमधून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान रात्री आठ वाजता उपविभागीय अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांनी सोयगाव ला भेट दिल्यानंतर हा ठिय्या रात्री आठ वाजता माघार घेण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांचे शी सुनील गव्हांडे,माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, उपसरपंच संजय पाटील,सुनील ठोंबरे, लोकेश पाटील यांच्यासह आदींनी चर्चा करून चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांनी दिल्या वर ठिय्या माघार घेण्यात आला दरम्यान बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख सचिन चौधरी यांच्या वर लाठी हल्ल्याची चौकशी करून संबंधिता वर कारवाई करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे यांनी दिले दरम्यान सोयगावात परिस्थिती हाताबाहेर गेल्याने फरदापुर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलाविण्यात आला रात्री नऊ वाजता परिस्थिती नियंत्रणात आली होती.गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर ठिय्या करण्याची वेळ आल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
(सहयोगी पत्रकार दिलीप शिंदे सोयगाव)
0 Comments