महाशिवरात्रीनिमित्त साईप्रसादालयात 45 पोते शाबुदाणा, 3700 किलो शेंगदाणे, 661 किलो तूप, 2254 किलो बटाटे यांचा खिचडी महाप्रसाद!

शिर्डी( प्रतिनिधी) 
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्‍सव साजरा करण्‍यात आला.
आज  बुधवारी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली. त्‍यानंतर सकाळी ०५.५० वाजता श्रींचे मंगलस्‍नान होवुन शिर्डी माझे पंढरपुर ही आरती झाली. त्‍यानंतर ०६.२५ श्रींच्‍या दर्शनास प्रारंभ झाला. दुपारी १२.०० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायंकाळी ०६.१५ धुपारती झाली. रात्रौ ०७.३० ते ०८.३० यावेळेत समाधी मंदिरातील स्‍टेजवर मंदिर कर्मचारी किशोर सासवडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, तर रात्रौ ०९.१५ वाजता श्रींचे पालखीची शिर्डी गावातुन मिरवणुक संपन्‍न होईल. पालखी समाधी मंदिरात परत आल्‍यानंतर श्रींची शेजारती होईल. तसेच रात्रौ १२.२७ ते रात्रौ ०१.१६ यावेळेत श्रींच्‍या गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा होईल. 
महाशिवरात्री निमित्‍त संस्‍थानच्‍या श्री साईप्रसादालयात अंदाजे सुमारे ३५ हजार साईभक्‍तांनी मोफत प्रसादरुपी शाबुदाणा खिचडीचा लाभ घेतला. याकरीता सुमारे ४५ पोते शाबुदाणा, ३७०० किलो शेंगदाणे, ६६१ किलो तुप व २२५४ किलो बटाटा वापरण्‍यात आले. तर सुमारे १४ हजार ५५७ नाष्‍टा पाकीटांचा साईभक्‍तांनी लाभ घेतला. महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीत श्री गुरुस्थान मंदिर, श्री साई समाधी मंदिर, द्वारकामाई मंदिर, श्री साई चावडी मंदिरामध्ये साई दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येत होती.
(सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी)


Post a Comment

0 Comments