शिर्डी ( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील श्रीपाद शिव कुटी श्री नर्मदेश्वर सेवाधाम येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री नर्मदेश्वर सेवाधाम चे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भक्त परिवाराच्या वतीने बुधवार 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाशिवरात्रीनिमित्त येथे पहाटे पाच ते दहा वाजेपर्यंत श्रींना अभिषेक व पूजन करण्यात आले. त्यानंतर गावात रथा मधून भव्य मिरवणूक सोहळा संपन्न झाला. त्यानंतर दुपारी पंचपदी भजन व शिव भजन मंदिरात संपन्न झाले. त्यानंतर दुपारी श्रीपाद सेवक संघ सावळीविहीर तर्फे फराळ महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी महंत आत्मारामगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून महाशिवरात्री कथा संपन्न झाली. यावेळी श्री नर्मदेश्वर सेवाधामचे मंहत श्री आत्मारामगिरीजी महाराज यांच्या हस्ते
ह.भ.प. रतन महाराज इंगळे श्रीपाद शिव कुटीचे प्रथम अधिकारी यांस प्रेमगिरी उपाधीने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी समस्त पिंपरी निर्मळ ,लोणी बुद्रुक, वैजापूर, सावळीविहीर भजनी मंडळाची साथ संगत राहीली.भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमांचा व दर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी श्री नर्मदेश्वर सेवाधाम व मंहत आत्माराम गिरीजी महाराज भक्त मंडळ यांनी परिश्रम घेतले.
0 Comments