टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खोकर गावच्या तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय बबनराव चव्हाण यांची २६ जानेवारी ग्रामसभेमध्ये सर्वांनुमते निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीबद्दल खोकर ग्राम. सदस्य दीपक काळे, अशोकचे संचालक ज्ञानेश्वर काळे, दादासाहेब काळे, कामगार नेते गणेश छल्लारे, खोकर सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रकाशराव पवार, सुरेश काळे, सदाशिव पटारे, संजय काळे, अशोक काळे,बाबासाहेब कोल्हे, महेश घुणे, रमेश पटारे,बाबासाहेब बोडखे, सुजित बोडखे, अजित बोडखे, नानासाहेब जाधव आदी सह खोकर व टाकळीभान परिसरातील ग्रामस्थांनी त्यांच्या निवडीचे अभिनंदन केले आहे.
0 Comments