टाकळीभान प्रतिनिधी : ज्या गावातील शिक्षक चांगले त्या गावातील विद्यार्थी चांगले घडतात असे प्रतिपादन आपल्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त टाकळीभान जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल कडू सर यांनी केले.
टाकळीभान जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल कडू सर यांच्या सेवापुर्ती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकर जि. प. शाळेचे मुख्याध्यापक कचेश्वर जठार होते. यावेळी कडू मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोकणे, केंद्रप्रमुख शिंदे सर,अर्जुन राऊत, मुख्याध्यापक बाबासाहेब मते सर, निवृत्त मुख्याध्यापक भालदंड सर,किसनराव शेटे सर, कडू सर यांचा परिवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्याध्यापक बाबासाहेब मते सर बोलताना म्हणाले की मुख्याध्यापक कडू यांनी आपल्या कार्यकाळातील अतिशय चांगली शैक्षणिक सेवा दिली असून, असा मुख्याध्यापक शाळेला परत भेटणे अवघड आहे. शेवटच्या दिवसापर्यंत शाळेसाठी तन-मन-धनाने परिश्रम घेऊन येथील शाळेच्या प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या विकासाकरता प्रामाणिकपणे मेहनत घेणारे मुख्याध्यापक या शाळेला लाभले होते. त्यांनी अतिशय यशस्वीरित्या आपल्या शिक्षकी पेशाला न्याय दिला असून त्यांच्या चांगल्या कामाची आठवण या शाळेला व गावाला नेहमी राहील. तसेच टाकळीभान जिल्हा परिषद शाळेची यशस्वी परंपरा त्यांनी टिकून ठेवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
याप्रसंगी किसन शेटे सर, केंद्रप्रमुख शिंदे सर,उज्वला शेळके, जया चव्हाण , अर्जुन राऊत, गणेश कोकणे, भालदंड सर, कडू मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष कचेश्वर जठार यांनी मनोगत व्यक्त करून कडू सर यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक सेवेबद्दल भरभरून कौतुक केले व त्यांना पुढील सुखमय, आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक कडू सर यांनी टाकळीभान जिल्हा परिषद शाळेत दीर्घकाल २६ वर्षे सेवा दिल्याने अनेक विद्यार्थी घडवले असून ते विविध मोठ्या हुद्द्यावर आहेत. गुरुजींचा करारी, शिस्तप्रिय, विद्यार्थी प्रिय स्वभाव असल्याने विद्यार्थ्यां, पालक व शिक्षक स्टाफच्या मनावर गुरुजींची एक वेगळी प्रतिमा होती. टाकळीभान येथे अतिशय उत्कृष्ट व छान सेवा दिल्यामुळे त्यांचे सर्व शिक्षक सहकारी व विद्यार्थी यांना कडू सर यांना निरोप देताना गहिवरून आले व प्रत्येकाचे डोळे पाणवले होते. विद्यार्थीही डोळे पुसत पुसत कार्यक्रम ऐकत व पाहत होते व आपल्या आवडत्या शिक्षकाला निरोप देत होते. काही छोट्याशा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कडू सर यांच्या बद्दल आपल्या मनोगतातून भावनिक मनोगत व्यक्त केले व आपल्या आवडत्या शिक्षकांना सेवापूर्ती व पुढील सुखमय व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य बी.टी. इंगळे, सुजित बनकर, ठोकळ सर, शिवाजी पटारे, यशवंत गागरे, उज्वला पाचरणे, ज्योती गावडे आदी सह शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार कानडे सर यांनी केले तर आभार सुनीता जाधव मॅडम यांनी मानले.
0 Comments