वेबसाईट बंद, सोयगाव तालुक्यात आता लाडकी बहीण योजनेची लिंक मिळेना--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.02 - शासनाच्या ' लाडकी बहीण' योजनेची लिंक मिळत नसल्याने सोयगाव तालुक्यातील अनेक महिला लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी निवडणुकीच्या आचारसंहितेपासून बंद असलेले संकेतस्थळ (वेबसाईट) आता विधानसभेच्या निवडणुकीनंतरही सुरू झाले नसल्याने हे संकेतस्थळ कधी सुरू होणार याकडे वंचित लाडक्या बहिणींचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या आधी  लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोयगाव तालुक्यात पाच टप्प्यांत नऊ हजार  रुपयांचे अनुदान लाडक्या बहिणींच्या बैंक खात्यात पाठविले. त्यामुळे सर्वांच्या बरोबरीने गोरगरीब जनतेची दिवाळी व संक्रांत गोड झाली.नवीन वर्षात अनुदानाचा सहावा हप्ताही  जमा झाला आहे .परंतु या योजनेपासून वंचित राहिलेल्या व 21 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना या योजनेचा अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत.महायुतीचे सरकार पोर्टल कधी सुरू करणार?, असा प्रश्न नव्याने अर्ज भरण्यासाठी पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना पडला आहे.
       पोर्टल कधी सुरु होईल हे सांगता येणे शक्य नाही
 दरम्यान, लिंक बंद असल्याबाबत  संबंधित प्रशासनाकडे चौकशी केली असता, ही लिंक जेव्हापासून बंद झाली, तेव्हापासून सुरू झाली नाही आणि पोर्टल केव्हा सुरू होईल, हे मात्र सांगता येणार नसल्याची माहिती देण्यात आली.परंतु, योजनेची लिंक अथवा पोर्टल सुरू नसल्याने अर्ज कुठे व कुणाकडे करायचा?, असा प्रश्न अनेक युवतींना उपस्थित होत आहे.
    --योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत मिळविले यश--
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. यासाठी प्रत्येक कुटुंबातील दोन महिला, उत्पन्न अडीच लाखांच्या आत, चारचाकी वाहन नको, लाभार्थी नोकरदार व करदाता नसेल, अशा अनेक प्रकारच्या अटी व शर्ती घालून दिल्या होत्या. महायुती सरकारने या योजनेचा प्रसार-प्रचार करून विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवीत मोठ्या मताधिक्याने सत्ता मिळवली.परंतु आता 21-वर्ष वय पूर्ण झालेल्या पात्र 'लाडक्या बहिणीं'ना या योजनेचा अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत.


Post a Comment

0 Comments