दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि. 01 - सोयगाव तालुक्यातील बनोटी विज केंद्रांतर्गत पुरविल्या जाणारा विजपुरवठा अवेळी खंडीत होत असल्याने विहीरीत पाणी असुन देखील विजेअभावी पिकांना पाणी देऊ शकत नसल्याने पाण्याअभावी पिके कोमजु लागल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहे.
या प्रकाराला वैतागून शुक्रवारी रात्री चक्क वनगाव,पहुरी,वाकडी शिवारातील शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीचा जाहीर निषेध करून रात्री अकरा वाजता शेतातून व्हिडीओ व्हायरल केला या व्हायरल व्हिडीओ ची शनिवारी जिल्ह्यात चर्चा झाली आहे.
बनोटी विज केंद्रांतर्गत चार फीडर असुन ह्या फीडरला टप्पा टप्प्याने विज पुरवठा पुरविला जातो परंतु गेल्या एक महिन्यापासून ह्या केद्राअतर्गत शेती शिवारात विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी कोमजु लागली आहे वरठाण सह बनोटी गोदेंगाव पहुरी,हनुमंतखेडा,वाकडी,तिडका, बोरमाळ तांडा,वाडी,पळाशी आदी परीसरात रब्बी हंगामातील मका,ज्वारी,गहु हरभरा बाजरी आदी पिकांचा मोठ्या प्रमाणावर पेरा करण्यात आला असुन ह्या पिकांना आता पाण्याची नितांत गरज आहे आधी आठ तास विजपुरवठा मिळत असे परंतु आता दिवसाकाठी पाच तास विजपुरवठा मिळत असुन तो देखील विज पुरवठा वेळोवेळी खंडीत होत असल्याने विज वितरण कंपनीच्या कारभारावर रोष व्यक्त करीत आहेत. विजपुरवठा खंडीतला शेतकरी वैतागले असून या त्रासाला शेतकरी मेटाकुटीला आला आहे यामुळे हातातोंडाशी आलेला घास विजेअभावी हीरवुन जाण्याची दाट शक्यता आहे बनोटी विजकेद्रास पाचोरा तारखेडा अशी विज पुरवठा पुरविली जाते अनेकवेळा पाचोरा कींवा तारखेडा विज फाल्ट असे नेहमी होत आहे. वाकडी वनगाव,पहुरी,शिवारातील काही शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता वेळोवेळी विज पुरवठा खंडीत होत असल्याने रात्रीच्या अकरा वाजता सर्व शेतकरी एका ठिकाणी जमा होत ह्या शेतकऱ्यानी विज वितरण कंपनीचा जाहीर निषेध केला असुन एक व्हिडिओ तयार करुन सोशल मिडिया वर व्हायरल केला आहे तरी विज वितरण कंपनीने उपाययोजना राबवुन शेतकऱ्यांना सुरळीत विज पुरवठा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गामधुन होत आहे यावेळी निलेश मगर ,राजेंद्र निकम.,राहुल निकम,वैभव मगर,देविदास मगर, गणेश मगर,रवींद्र सपकाळ,गोपाल जाधव,पांडा झाल्टे,सुरेश निकम,आयुब पठाण,आदी शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठा मुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून
यावर्षी अतिपावसामुळे खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर सडपड झाल्याने शेतीसाठी लागलेला खर्च देखील निघाला नाही परंतु ही भर रब्बी हंगामातील पिकांमध्ये निघेल ह्या आशापोटी प्रत्येक शेतकरी आपापल्या परीने मका ज्वारी,बाजरी आदी पिकांचा पेरा केला असुन त्या पिकांना विहीरींना मुबलक पाणी असुन विजेअभावी पाणी देऊ शकत नसल्याने रब्बी हंगामा देखील धोक्यात आला आहे.
0 Comments