टाकळीभान प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील
टाकळीभान येथील टेलटँक मधून शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी आनंद धुमाळ यांनी केली आहे.
प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे की, सर्व धरणे, टाकळीभान टेलटँक पुर्ण क्षमतेने भरलेले आहेत.रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने असतात व रब्बी हंगाम २८ फेब्रुवारीला संपतो त्यामुळे
पाणी जानेवारी अखेर यायला पाहिजे पण पाणी आले
नाही. भारत देश हा कृषी प्रधान देश आहे मात्र कृषि
मंत्री व जलसंपदा मंत्री यांचे याकडे अजिबात लक्ष नाही. आवर्तन वेळेवर सोडण्याची गरज आहे व आवर्तन वेळेवर सुटण्यासाठी शेतकर्यांनी पाणी अर्ज
वेळेवर दिले पाहिजेत पण शेतकरी पाणी अर्ज देत नाहीत. ज्यांनी पाणीअर्ज दिलेले आहेत त्यांना पाणी
मिळालेच पाहिजे व त्यांनाच पाणी द्यावे ज्यांनी पाणी
अर्ज भरलेला नाही त्यांना पाणी देण्यात येवू नये त्यांना पाणी न मिळाल्यास ते पाणी अर्ज भरतील व
पाणीपट्टीही भरतील त्यामुळे पाणीही वेळेवर मिळेल. सध्या टाकळीभान सह परिसरातील विहीरी व कुपनलीकांच्या पाण्याने तळ गाठला असून पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे त्याचा फटका सध्या रब्बी हंगामातील पिकांना बसत आहे.
रब्बी हंगामातील कांदा, गहु, हरबरा, मका आदी पिकांना पाण्याची नितांत गरज आहे मात्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने पाण्या अभावी उभी पिके होरपळून जातील. आधीच शेतकरी कर्जबाजारी
असून रब्बी पिके जळून गेली तर शेतकर्यांनी घेतलेले
कर्ज कसे भरणार तरी जलसंपदा मंत्री व तालूक्याचे
आमदार यांनी लक्ष घालून लवकरात लवकर टेलटँक
मधून शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी मागणी धुमाळ
यांनी केली आहे.
0 Comments