दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.22- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती चे औचित्य साधुन शिवकालीन तलाव,पाझर तलाव,गाव तलाव, यातुन गाळ काढण्याचा दि.२० रोजी सोयगाव तालुक्यातील घोसला व वरठाण येथे शुभारंभ करण्यात आला.
मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता नितीन दुसाने, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी अजितकुमार परांडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय जलसंधारण अधिकारी सुर्यकांत देविदास निकम यांनी एन.जी.ओ.एकात्मिक कृषी व मानव विकास संस्था प्रकल्प कार्यालय सोयगाव यांच्या व स्थानिक शेतक-यांच्या माध्यमातुन सोयगाव तालुक्यातील मौजे वरठाण व मौजे घोसला येथे गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या योजनेतुन प्रारंभ करण्यात आला.
दरम्यान गाळ काढण्याचा शुभारंभ पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. वरठाण येथे माजी जि.प.सदस्य नंदू बापू साळुंखे यांच्या हस्ते तर घोसला येथे सरपंच यांच्याहस्ते गाळयुक्त धरण-गाळयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार असुन निघालेला गाळ शेतक-यांच्या शेतात टाकण्यात येणार आहे. यासाठी शेतकरीही आपले योगदान देणार असुन जमिन सुपिक होणार आहे. दरम्यान शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायत सदस एन.जी.ओ.चे प्रमुख संगीता बिराजदार,संभाजी नागणे, मौजे घोसला येथे सरपंच, उपसरपंच सुभाष पाटील ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर युवरे,आप्पा वाघ, समाधान पाटील, गोलु बोरसे व प्रतिष्ठित नागरीक यांच्यासह मृद व जलसंधारण उपविभाग सोयगावचे वरीष्ठ सहा.उमेश निकम,सहा.शरद चव्हाण आदींची उपस्थिती होती.
सहयोगी पत्रकार दिलीप शिंदे सोयगाव
0 Comments