सावळीविहीरला-जल्लोष चिमुकल्यांचा या जि.प. शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांच्या बहारदार कार्यक्रमाने सर्वांना केले मंत्रमुग्ध!

शिर्डी ( राजकुमार गडकरी) राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जल्लोष चिमुकल्यांचा हा सांस्कृतिक व विविध गुणदर्शन सादर करणारा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

भव्य स्टेज, आकर्षक विद्युत रोषणाई, जबरदस्त साऊंड सिस्टिम, व गणेश वंदना, साईंची भक्ती गीते, आईचा जोगवा!!अशी  लोकप्रिय लोकगीते,व सिनेमा गीतांच्या  तालावर थरकणारी चिमुकले विद्यार्थी , आणि त्यांना स्फूर्ती देणारे व उत्कृष्ट अँकरिंग करणारे दत्ता गायकवाड सर तसेच या चिमुकल्या कलाकार विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे स्टेज समोरचे शेकडो प्रेक्षक यामुळे- जल्लोष चिमुकल्यांचा -हा सदाबहार असा हा कार्यक्रम सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेला.
 राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचां जल्लोष चिमुकल्यांचा हा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध गुणदर्शन व स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच सावळीविहीर बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात व शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
 या शाळेच्या प्रांगणामध्ये भव्य स्टेजवर प्रथम श्री साईबाबांच्या प्रतिमेचे सरपंच ओमेश जपे,राहाता बाजार समितीचे संचालक शांताराम जपे,मा. उपसरपंच गणेश कापसे, ग्रा.सदस्य सागर आरणे, युवा शिवसेनेचे संदीप विघे, शाळा समितीचे अध्यक्ष सागर जपे, पत्रकार राजकुमार गडकरी ,राजेंद्र दुनबळे, कैलास पळसे,शाळेचे मुख्याध्यापक मेहेत्रे सर, आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे येथे काही वर्ष कार्यरत असणाऱ्या व सेवानिवृत्त झालेल्या चौधरी मॅडम यांचा तसेच केंद्रप्रमुख पंकज दर्शने सर, जाधव मॅडम यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.प्रथम श्री गणेश वंदना करत या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्वांना भक्ती रसात चिबंवून टाकले. त्यानंतर अंबाबाई जागरणाला ये ग! गोंधळाला ये ग!!
आईचा जोगवा मागेन!!
मावळे आम्ही लढणार! शिवबाचे चाकर होणार!!
ये झुमक्यावाली पोर नदीथडीला चालली!!
लुंगी डांस ,लुंगी डांस!! अशा अनेक मराठी, हिंदी लोकगीते, सिनेमा गीते यावर या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे दिल खेचक असे नृत्य उपस्थित सर्वांनाच मंत्रमुग्ध करून गेले. एक से बढकर एक गीते व त्यावर चिमुकल्या विद्यार्थ्यांचे झालेले सामूहिक नृत्य , साजेशे गणवेश, व प्रत्येक नृत्याच्या वेळी चिमुकल्या कलाकार विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावरील हावभाव सर्वच प्रेक्षक, पालक, शिक्षक यांना भावून जात होते. त्यामुळेच उपस्थित पालक, माजी विद्यार्थी, महिला, प्रेक्षक यांच्याकडून या चिमुकल्या विद्यार्थ्यांवर प्रत्येक गाण्याला बक्षीसांचा वर्षाव होत होता. विविध गाण्यांना प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना प्रेक्षकांची टाळ्यांची साथ आणखी प्रोत्साहित करीत होती. भव्य व्यासपीठ, आकर्षक विद्युत रोषणाई, जबरदस्त साऊंड सिस्टिम, यामुळे या जल्लोष चिमुकल्यांचा कार्यक्रमाला आणखीनच रंगत आली.  मोठा जोश या चिमुकल्या विद्यार्थी कलाकारांमधून दिसून येत होता.या कार्यक्रमासाठी कोरिओग्राफी शुभम गायकवाड आणि प्रणाली पट्टेकर यांनी केली होती. हा कार्यक्रम फक्त दहा दिवसात विद्यार्थ्यांचा सराव घेऊन सादर करण्यात आला. त्यासाठी या सावळीविहीर बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब मेहेत्रे सर, केंद्रप्रमुख सोमनाथ जावळे, सर, शिक्षक दत्ता गायकवाड सर, सिताराम गुरसळ सर, शिक्षिका रूपाली मेंद्रे मॅडम, सुचित्रा चवाळे मॅडम, विद्या गोर्डे मॅडम, श्रीमती प्रियंका जाधव मॅडम,
आदींनी मोठे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शाळेचे विद्यार्थी ,माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक ,युवक, महिला, ग्रामस्थ ,प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते .त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी व  मान्यवरांनी, पालकांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बक्षीसे दिली .या सर्व पालकांचे पदाधिकाऱ्यांचे व ग्रामस्थांचे शाळेच्या वतीने दत्ता गायकवाड सर यांनी शेवटी खूप खूप धन्यवाद मानले.

Post a Comment

0 Comments