बाभळेश्वर(वार्ताहर) राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे माहिती अधिकार संघर्ष समिती व समस्थ ग्रामस्थ बाभळेश्वर यांच्यावतीने शिवजन्माचा सोहळा अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
१९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा सोनेरी दिवस मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास लोणी पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक कैलास वाघ व गायत्री पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र मोकाशी यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी रयतचे शिक्षण संस्थेचे विभागीय निरीक्षक प्रमोद तोरणे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना ते त्यांची एकूण कार्यपद्धती अशी महाराजांची विविध कौशल्ये मांडली. शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून, त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे असे सांगितले.
याप्रसंगी पंचायत समितीचे मा.उपसभापती बबलू म्हस्के, जेष्ठ विधीतज्ञ भास्कर पठारे, राहाता तालुका कृषी विभागाचे अधिकारी किशोर कडू, संदीप गायकवाड, उपसरपंच प्रमोद बनसोडे, विकास सोसायटीचे चेअरमन दौलत बेंद्रे, व्हा.चेअरमन अनिल म्हस्के, प्रवरा कारखान्याचे मा.संचालक अण्णासाहेब बेंद्रे, भाऊसाहेब म्हस्के, मा.सरपंच राजू म्हस्के, ग्रा.प.सदस्य अजित बेंद्रे, श्रीकांत शिंदे, तरुण उद्दोजक गणेशशेठ कदम, रवी बेंद्रे सर, दत्तू बेंद्रे, भास्कर तात्या खर्डे, बुरुड समाज जिल्हाध्यक्ष सोमनाथ वडतेले, लोहगावचे सरपंच शशीकांत पठारे, लातूर पॅटर्ण चे बापू भोसले, दादा पठारे, आयुब शेख, अॅड.नदीम शेख, अॅड.राहुल कदम, अॅड.दिनेश भालेकर संजय इनामके, संदीप राऊत, विकास शेळके, रमेश दळे, सुजयदादा विखे पाटील मित्र मंडळाचे तुकाराम शंकर बेंद्रे, मीननाथ म्हस्के, शंकर रोकडे, विष्णू कोकाटे, बाबासाहेब शिंदे, किरण पंडित, शिवसेनेचे अण्णासाहेब आरगडे, भाऊसाहेब मोरे, सोमनाथ मेढे, प्रकाश बागुल, राहुल हुंडेकरी, नितीन बनसोडे, राजू कोकाटे, पंढरी गायकवाड, विठ्ठल जाधव, रवी शेलार, साहिल शेख, जावेद शेख, दादा पाटील, मच्छिंद्र यादव, गणेश खोबरे, शिवाजी कोकाटे, लक्ष्मीकांत रावते (दाजी), लोणीचे ग्रा.प.सदस्य संजय घोगरे, शिवाजी बेंद्रे सर, राजू भालेराव, अजित ब्राम्हणे, भास्कर कदम, अनिकेत गवारे, सचिन माघाडे, केशव बेंद्रे, आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरखदादा गवारे यांनी मानले.
0 Comments