दिव्यांगाच्या पेन्शनमध्ये वाढ करा.. अभिनेता प्रमोद पंडित

लोहगाव 
(प्रतिनिधी) देशातील बऱ्याच राज्यात दिव्यांगांना समाधानकारक पेन्शन योजना चालू आहे पण महाराष्ट्रातच ती तुटपुंजी का? असा सवाल केला आहे.

 दादासाहेब फाळके चित्रपट युनियन यांचे आहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अभिनेते प्रमोद पंडित यांनी. 

आंध्र प्रदेशात दिव्यांगांना ६००० पेन्शन मिळते तर गोवा राज्यात ३००० हजार असुन दिल्लीत ५००० आहे.तर महाराष्ट्रात १५०० रुपये का? शासनाला आमची विनंती आहे की ४० ते ७९ टक्के दिव्यांगांना ६००० तर ८० ते १०० टक्के दिव्यागांना १०,००० पेन्शन वाढ शासनाने करावी अशी मागणी अभिनेते प्रमोद पंडित यांनी केली.

Post a Comment

0 Comments