श्रीराम असंघटित बांधकाम कामगार संघटनेने केलेल्या मागणीला यश ...गणेश छल्लारे,

टाकळीभान प्रतिनिधी -
श्रीराम असंघटित बांधकाम कामगार संघटनेने केलेल्या मागणीला यश आले. अनेक दिवसांपासून संघटनेने मागणी केली होती, या मागणीवर शासनाने निर्णय घेऊन, बांधकाम कामगार मंडळाच्या आदेशानुसार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एन्ट्रीचे काम बंद करण्यात येत आहे.

 बांधकाम कामगार आपले नोंदणी , नूतनीकरण व लाभाचे अर्ज online पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. ६ फेब्रुवारी २०२५ पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर रहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील. श्रीराम असंघटित बांधकाम कामगार संस्थापक गणेश छल्लारे व इतर कामगार संघटना अहिल्यानगर.

Post a Comment

0 Comments