शांतिगिरी महाराज यांचा जगद्गुरु उपाधीने कुंभमेळ्यात सन्मान




बाभळेश्वर( वार्ताहर) तीर्थराज प्रयागराज येथे सुरू असलेल्या महा कुंभ पर्वाच्या पावन अवसरावर श्री शंभू पंच दशनाम जुन्या आखाड्याच्या सर्व गुरु मूर्तीच्या पेरणेने आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरी गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने जुना पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते महामंडलेश्वर श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचा जगद्गुरु या उपाधीने कुंभमेळ्यामध्ये सन्मान करण्यात आला.

प्रयागराज पुण्यभूमी पार पडलेल्या या भव्य सोहळ्याला हजारो साधू संत महंत आणि लाखो भाविकांनी साक्षीदार म्हणून उपस्थिती लावली शंभू पंचदशनाम चुना आखाड्याने त्यांच्या महान कार्याची दखल घेत स्वामी शांतिगिरी जी महाराज यांना आखाड्याचे दुसरे जगद्गुरु पद प्रदान केले. महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज हे जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनागिरीजी )महाराज यांचे उत्तराधिकारी असून त्यांनी लाखो भक्तांना ज्ञान भक्ती आणि वैराग्याचा मंत्र देत अनुष्ठान परंपरा अखंडपणे पुढे सुरू ठेवली आहे. विशेष म्हणजे जगद्गुरु जनार्दन स्वामींनी घेतलेल्या संकल्पना नुसार महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर जवळपास १०८ आश्रमाची स्थापना करण्यात आली आहे .त्यासाठी स्वामी शांतिगिरी जी महाराज अथक परिश्रम घेत आहे .या उपक्रमामुळे हिंदू धर्म संस्कृतीच्या जतन आणि प्रचार प्रसाराला मोठा हातभार लागत आहे.  त्यांच्या कार्याची विशेष दखल घेत त्यांना सन्मानित  करण्यात आले अशी माहिती सिद्धी प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवाराचे जिल्हा सेवक डॉ .नामदेव बेंद्रे ,ऋषिकेश वैद्य ,संतोष बेंद्रे ,दत्तात्रय बेंद्रे ,श्रीकांत कडू सचिन कडून आदी जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवारा कडून अभिनंदन करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments