टाकळीभान प्रतिनिधी : येथे आगामी येणारी शिवजयंती, आंबेडकर जयंती, यात्रा उत्सव आदी उत्सवांच्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक टाकळीभान पोलीस दूरक्षेत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी रॉबिन बन्सल (प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी) पीआय दशरथ चौधरी व गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांना रॉबिन बन्सल (प्रशिक्षणार्थी,आयपीएस अधिकारी) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलताना पुढे म्हणाले की गावाची शांतता भंग करणाऱ्या, गावात हौदोस घालणाऱ्या अपप्रवृत्ती वाढत असून अवैध व्यवसायातून माया जमवून काही समाजविघातक कृत्य करत असतील व शांतता भंग करत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही . ऑनलाइन ओटीपी मागून फसवणुकीचे प्रकार घडत असून ग्रामस्थांनी सावध राहावे व असा प्रकार घडल्यास सुरक्षेसाठी १९३० या टोल फ्री नंबर वर संपर्क करावा. तसेच ग्रामस्थांच्या सूचनेनुसार दूरक्षेत्राबाहेर तक्रार पेटीची व्यवस्था केली जाईल, सध्या सुरू असलेल्या दहावी बोर्ड परीक्षा कॉफी मुक्त होण्यासाठी तसेच येणारे शिवजयंती, महाशिवरात्री उत्सव व आंबेडकर जयंती यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस संरक्षण देण्यात येईल याची ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी पो.नी. दशरथ चौधरी म्हणाले की मोठे गाव असूनही ग्रामस्थांनी मला सहकार्य केले त्याप्रमाणे बंसल साहेबांना ही सहकार्य करावे तसेच गावाची शांतता, सलोखा अबाधित ठेवावा व सर्व सण उत्सव ,गुण्या गोविंदाने साजरे करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्राचार्य जयकर मगर, मा. उपसरपंच राजेंद्र कोकणे, उपसरपंच कान्हा खंडागळे, नारायण काळे यांनी नागरिकांच्या वतीने समस्या मांडल्या.
यावेळी नूतन प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी रॉबिन बन्सल यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.शांतता कमिटी बैठक प्रसंगी भारत पवार, दादासाहेब कापसे ,विलास दाभाडे,शंकरराव पवार, चित्रसेन रणनवरे,भैय्या पठाण, महेंद्र संत,अमोल पटारे, मोहन रणनवरे,रावसाहेब मगर, अण्णासाहेब दाभाडे, अब्दुल करीम देशमुख, एकनाथ रणनवरे, आप्पासाहेब रणनवरे, सतीश रणनवरे हे,कॉ, राजेंद्र त्रिभुवन,पो.ना. अनिल शेंगाळे, बाबा सय्यद, अनिल लोणारे होमगार्ड आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.( सहयोगी पत्रकार दिलीप लोखंडे टाकळीभान )
0 Comments