विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती 2025 कार्यकारिणी जाहीर, अध्यक्ष संदिप पगारे तर उपाध्यक्षपदी दीपक नवगिरे --
दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.14 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक स्थित सारनाथ बौद्ध विहारात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 2025 उत्सव समितीच्या कार्यकारिणी निवडी संदर्भात नगरसेवक दीपक पगारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
यात उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी संदीप पगारे, उपाध्यक्ष दीपक नवगिरे तर कोषाध्यक्ष पदी राधाकृष्ण गायकवाड यांची निवड करण्यात आली.यावेळी शहरातील पुरुष बौद्ध उपासक, महिला उपासिका,युवक व बहुजन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments