(दिलीप लोखंडे)
टाकळीभान प्रतिनिधी -कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात नवीन हंगामासाठी कांदा खरेदी सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून व्यापारी, हमाल आणि मापाडी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे बुडविल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्या धर्तीवर व्यापाऱ्यांसाठी कडक नियमावली लागू करण्यात आली असल्याचे संचालक पटारे आणि दाभाडे यांनी सांगितले.
निविन हंगामासाठी खरेदी शनिवार दिनांक १ मार्च पासून सुरू करण्याचे यावेळी सर्वानुमते ठरले. यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतावर न विकता बाजार समिती मध्ये आणून विकावा असे आवाहन सभापती सुधीर नवले, सचिव साहेबराव वाबळे व सर्व संचालक मंडळाच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
या बैठकीसाठी शाखाधिकारी दिनकर पवार, व्यापारी व हमाल मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान
0 Comments