गो मूत्र साठवण व चाऱ्याचे नियोजन केल्यास दुग्ध व्यवसाय परवडणारा, सेवानिवृत्त सहायक आयुक्त डॉ बळीराम गायकवाड यांची माहिती-



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.27- शेतकऱ्यांना सध्याच्या दुधाचा दर पाहता दुग्ध व्यवसाय परवडत नाही त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांनी दुग्धजन्य व्यवसायाकडे वळावे दुग्धजन्य पदार्थ विक्री करून मोठा नफा होतो त्यासाठी चाऱ्याचे नियोजन व गो आधारित शेतीची कास धरा असे सेवा निवृत्त पशुधन सहायक आयुक्त डॉ बळीराम गायकवाड यांनी दि.27 गुरुवारी सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे तालुका स्तरीय गो आधारित शेती प्रशिक्षण शिबिरात केले.कच्च्या मालापासून घरच्या घरीच पशुखाद्य तयार करून जनावरे सशक्त बनवा जनावरांचे वजन वाढविण्यासाठी गोचीड निर्मुलन, दर तीन महिन्यांत वासराचे जंत निर्मुलन व वर्षातून दोन वेळा मोठ्या जनावरांचे जंत निर्मूलन आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले यावेळी डॉ किशन सिंग चारमोरे(सहायक आयुक्त पशुसंवर्धन सिल्लोड-सोयगाव),डॉ सुधीर मटवाले(पशुधन विकास अधिकारी सिल्लोड),डॉ. व्ही एच कांबळे सेवानिवृत्त अधिकारी, डॉ शरद पवार तालुका पशुसंवर्धन अधिकारी सोयगाव, संजीवन सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य वंदना पाटील,वर्षा चौधरी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती डॉ शरद पवार यांनी प्रशिक्षण शिबिराचे प्रास्ताविक केले.

     --- गो मूत्र साठवण गरजेचे--
दरम्यान गो आधारित शेती साठी गोमूत्र साठवून ड्रीप द्वारे पिकांना दिल्यास नत्र ची पूर्तता होते त्यामुळे गोमूत्र, निंबोळी अर्क, व शेणखत गो आधारित शेतीसाठी गरजेचे असल्याचे डॉ सुधीर मटवाले यांनी सांगितले यावेळी डॉ दानिश बुखारी, डॉ बालाजी जोगदंड, डॉ मंगेश काळे,डॉ अतुल दाभाडे,डॉ निलेश खोडके, डॉ मंगेश टाकसाळ, डॉ गणेश काकडे आदींसह गोविंदा पाटील,शेख शफिक, संदीप चौधरी, डॉ गजानन बोरसे, अंजनाई गोशाळेचे संदीप इंगळे, दिलीप शिंदे,ईश्वर इंगळे, समाधान सोनवणे,आप्पा वाघ, उत्तम गवळे,विष्णू वाघ, आदीं गो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
(सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव)

Post a Comment

0 Comments