शिर्डीत साईमंदिर व परिसरात सर्व संस्थान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पादत्राणे प्रवेशद्वारावर काढूनच प्रवेश करावा---साईसंस्थांनच्या सूचना

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर हे आंतरराष्ट्रीय देवस्थान असून येथील देवस्थानचे पावित्र्य राखले जावे,म्हणून साई संस्थांनने एक चांगला निर्णय घेतला असून या निर्णयाद्वारे साई संस्थानचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी साई समाधी मंदिर तसेच मंदिर परिसरात प्रवेश करताना आपली पादत्राणे संस्थान प्रवेशद्वाराच्या चप्पल स्टैंड वर ठेवून प्रवेश करावा अशा सूचना सर्व संस्थांन अधिकारी व कर्मचाऱ्यांना साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी एका पत्रकारन्वये दिल्या आहेत.
   या पत्रकात म्हटले आहे की, साई संस्थांनने यापूर्वीच निर्णय घेऊन साई संस्थांनचे अधिकारी, कर्मचारी यांनी साई मंदिर,व  परिसरात येताना आपली  पादत्राणे या संस्थान मंदिर परिसर प्रवेशद्वारासमोरील चप्पल स्टैंड वर काढून प्रवेश करावा. असे कळविण्यात आले होते. मात्र तरीही अनेक अधिकारी, कर्मचारी हे या सूचनेची अंमलबजावणी करताना दिसत नाहीत. असे लक्षात आल्यानंतर परत साई संस्थांनने सर्व विभागांना लेखी पत्राद्वारे कळविले असून या पत्रात म्हटले की, साई संस्थांनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी साई समाधी मंदिर व मंदिर परिसरात येताना आपली पादत्राणे संस्थान प्रवेशद्वाराच्या चप्पल स्टैंड वर काढूनच आत मध्ये प्रवेश करावा. अन्यथा अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. असे म्हटले आहे. तसेच या पत्रात म्हटले आहे की, संस्थानच्या विद्युत तांत्रिक कर्मचारी व सफाई कर्मचारी यांना कामाच्या वेळी आवश्यक त्या ठिकाणी आपल्या पादत्राणे वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे या पत्रात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments