ना.विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ!६फेब्रुवारी पर्यत सुरू राहाणार खरेदी केंद्र



लोणी दि.३१ प्रतिनिधी 

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमतीत सोयाबीन खरेदी करण्यासाठी ६फेब्रुवारी २०२५ पर्यत मुदतवाढ  देण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी ना.विखे पाटील यांनी पाठपुरावा केला होता.


हंगाम २०२४-२५ मध्ये आधारभूत किंमतीने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.यासाठी ३१जानेवारी २०२४ पर्यतची मुदत देण्यात आली होती.

जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.त्याप्रमाणात खरेदी केंद्राची संख्या कमी असल्याने सोयाबीन खरेदी मोठ्या होणे बाकी आहे.यासंदर्भात अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पालक मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

ना.विखे पाटील यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी संपर्क साधून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याबाबत निर्णय करण्याबाबत चर्चा केली.विशेष म्हणजे मंत्री जयकुमार रावल दिल्ली मध्येच असल्याने त्यांनी याबाबत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देत असल्याचे ना.विखे पाटील यांना कळवले.

सहकार व पणन विभागाच्या अप्पर सचिव संगिता शेळके यांनीही शासनाचे परीपत्रक काढून या निर्णयाची माहीती जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी करणाऱ्या केंद्राना कळवली आहे.

Post a Comment

0 Comments