--संत तुकाराम महाराज जयंती- विशेष - धर्म संस्कृती व पर्यावरण यात महत्व असलेल्या नांद्रुक या देववृक्षाचे भराडी येथील मंदिर परिसरात रोपण-



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि. 01 -जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या समाधी स्थळी नांद्रुक/ नांदरकी नामक 600 वर्षेहुन  पुरातन वृक्ष आहे. याच वृक्षाखालून संत  तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. 



दर वर्षी तुकाराम बिजेस लाखो हिंदू धर्मीय भाविक  देहू येथे जमतात व त्यांच्या स्थळ काळ ऊर्जेने बीजेच्या दिवशी बरोबर 12 वाजून 2 मिनिटांनी या नांद्रुक वृक्षाची पाने जोरात हलतात,सळसळतात. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ,पक्षी ही सुस्वरे आळविती  हा पर्यावरणाचा संदेश देणारे संत तुकाराम  महाराज हे आद्य निसर्ग संवर्धन असल्याने  व  अध्यात्नातून पर्यावरण संवर्धन व्हावे, दुर्मिळ वृक्ष वाढीस लागावे म्हणून सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व पर्यावरण संवर्धक डॉ.संतोष पाटील यांनी हरितवारी  उपक्रमाद्वारे आज संत तुकाराम महाराज जयंती निमित्ताने भराडी येथील संत सेना महाराज मंदिराच्या प्रांगणात  नांद्रुक या वृक्षाचे हभप बाबुराव महाराज बिडवे,डॉ.संतोष पाटील, राजेश पांडव, रत्नाकर बिडवे, बाळू पांडव, आदींच्या हस्ते  2 नांदरकी चे रोपण करण्यात आले व संगोपनाची जबाबदारी ही देवस्थानाने स्वीकारली आहे.सदर रोप हे इंद्रायणी काठच्या व देहू परिसरातील नांद्रुक वृक्षाच्या छोट्या फांदी पासून निर्मित आहे. 


    --नांद्रुक वृक्ष महती-हा दाट सावलीचा वृक्ष वडाच्या कुळातील असून दिवसातून 18 ते 20 तास प्राणवायू उत्सर्जित करणारा आहे.वातावरणातील उष्णता व कार्बन वायू  मोठ्या प्रमाणात शोषणारा आहे.निसर्गातील ए.सी.असे त्यास संबोधले जाते. दीर्घायु आहे.                       ---जैवविविधतेतील भूमिका---  याची फळे खाणारे व अधिवास करणारे पक्षी-लालबुड्या बुलबुल,शिपाई बुलबुल,हळद्या,कोकीळ,चस्मेवाला,राखी धनेश,आदी 17 जातींचे पक्षी व खार, माकड, वटवाघूळ आदी वन्यजीव ही फळं आवडीने खातात.याची फळं ही औषधी गुणाने ही संपन्न असा वृक्ष आहे.
            डॉ.संतोष पाटील,सिल्लोड-सोयगाव          जि.छ.संभाजी नगर


Post a Comment

0 Comments