टाकळी भान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,श्रीरामपूर अंतर्गत औजार बॅंक मार्फत ट्रॅक्टर व त्यासोबतचे शेती औजारे गट विकास अधिकारीप प्रवीण सिनारे,तसेच कृषी अधिकारी पंचायत समिती, शेख यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले,
सदरील औजार बैंक यासाठी दत्तनगर प्रभागातील भरारी महिला प्रभाग संघातील, बंधन महिला ग्रामसंघ गळनिंब यांना ते वितरीत करण्यात आले या वितरण कार्यक्रमासाठी प्रभागसंघ व ग्रामसंघ पदाधिकारी,तालुका अभियान कक्षातील तालुका अभियान व्यवस्थापक किरण शेरे सर,तालुका व्यवस्थापक चंद्रलेखा गायकवाड मॅडम,दत्तनगर प्रभाग चे प्रभाग समन्वयक अशोक रास्कटला उपस्थित होते.
0 Comments