शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथील
आदर्श बाल प्राथमिक, माध्यमिक,व इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभशाळेच्या प्रांगणात नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे डाॅ. पांडुरंगजी गुंजाळ , पत्रकार सतिष वैजापूरकर, राजेशजी पावसे (गटशिक्षणाधिकारी )
राहाता व संस्थेचे अध्यक्ष
डॉ. प्रबोध उध्दव जोशी व सचिव श्री. अशोक जगन्नाथ गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला .गाणे नृत्य यांनी उपस्थितांचे मने जिंकली.
या कार्यक्रमात शैक्षणिक संकुलातील सर्व विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
यामध्ये धनवटे मॅडम, रोकडे मॅडम, जोरी मॅडम, वर्पे मॅडम, वाघ मॅडम, भडांगे मॅडम,खरात मॅडम, मराठे मॅडम, त्रिभुवन मॅडम, उगले मॅडम, ब्राह्मणे मॅडम, माने मॅडम, जोगस मॅडम, रहाणे मॅडम, कुलकर्णी मॅडम,इंगळे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम नियोजन केले.त्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापक परजणे सर, (इंग्लिश मिडियम विभाग)
सुर्यवंशी सर (प्राथमिक विभाग)
खुळे मॅडम (माध्यमिक विभाग)
यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलकर्णी मॅडम व ननवरे मॅडम तसेच विद्यार्थ्यीनी शिकारे व पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी आदर्श शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यी ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक ,शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments