शिर्डी( प्रतिनिधी) आपला साईबाबांवर खूप विश्वास असल्याने वर्षातून एकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असते असं सांगत माझा मुलगा यश यांने नुकतेच चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले असून त्याचा नवीन चित्रपट लवकरच येत आहे. जसं यश चे वडील गोविंदा यांनी चित्रपटात नाव कमवलं तसं यशचे अधिकाधिक चित्रपट दुनियेत नाव व्हावं. अशी साईबाबांना प्रार्थना केल्याचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता गोविंदा यांच्या पत्नी सुनीता आहुजा यांनी म्हटले आहे.
सुनिता आहूजा यांनी शिर्डीत श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
गेल्या अनेंक दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनिता आहुजा वेगवेगळे राहत असल्याची चर्चा सुरू होती. यावर सुनिता आहुजा यांनी सांगितले की "आमची मुलगी मोठी झाली आहे. गोविंदा राजकारणात आल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते सगळे घरी येत होते. त्यामुळं गोविंदानं आपलं ऑफिस बाहेर उघडलं. गोविंदा आणि मला या जगात कोणीच वेगळं करू शकत नाही. गोविंदा आणि मला वेगळं करणारं कोणी असेल तर त्यानं समोर यावं,"असेही त्या म्हणाल्या.
घरातील लोकच घर तोडण्याचं काम करताय. मात्र, त्या लोकांना मी कधीच जिंकु देणार नाही. आणि माझं घर कधीच तुटू देणार नाही."असे सांगत सुनीता आहुजा पुढे म्हणाले की,
"मी साईबाबांना खूप मानते. खूप विश्वास असल्यानं वर्षातून एकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येते. माझा मुलगा यश यानं नुकतंच चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं असून, त्याचा नवीन चित्रपट येतोय. यशचे वडील गोविंदा यांनी चित्रपटात आपलं जसं नाव कमावलं, त्यापेक्षा चार पटीनं यशचं नाव चित्रपट दुनियेत व्हावं यासाठी साईबाबांना प्रार्थना केली असल्याचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता गोविंदा यांच्या पत्नी सुनीता आहूजा यांनी सांगितले.
0 Comments