हिमालयातील शिवगिरी महाराजांबरोबर सातव्या दिवशी दुर्गा शताब्दीचा पाठ आमच्या दृष्टीने एक अद्भुत आणि अध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरला--महंत आत्मारामगिरीजी महाराज

शिर्डी (प्रतिनिधी) प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू असून सुमारे 45 दिवस चालणाऱ्या या महा कुंभ मेळ्यामध्ये अनेक साधुसंत महंत यांचे दर्शन व आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होत असून असा हा भाग्याचा महा कुंभ सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा व आनंददायी असा आहे. असे मत मंहत आत्माराम गिरीजी महाराज यांनी प्रयागराज येथे व्यक्त केले आहे. 

त्यांनी पुढे म्हटले आहे की, आमचा प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात  सातवा दिवस असून हा आमच्या दृष्टीने मोठा विशेष ठरला आहे. कारण या दिवशी आम्हाला हिमाचल प्रदेशातील शिवगिरी महाराज यांच्या सोबत राहण्याचे भाग्य मिळाले आहे. त्यांच्या समवेत उपस्थित राहणे म्हणजे  अध्यात्मिक उर्जेचा मोठा अनुभव आहे. शिवगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गासप्तशती पाठ करण्यामागेही मोठे महत्त्व असून तो  एक सुसंस्कृत अनुभव ठरला आहे.दुर्गासप्तशती पाठाचे महत्त्व मोठे आहे.. दुर्गामहात्म्य, दुर्गासप्तशती, ज्याला देवीमहात्म्य किंवा चंडीपाठ असेही म्हणतात, हे देवीच्या शक्तीचे आणि विजयाचे वर्णन करणारे ग्रंथ आहे. यामध्ये 700 श्लोक आहेत, जे तीन भागांमध्ये विभागलेले आहेत:

प्रथम चरित्र: महाकालीचे रूप.
मध्यम चरित्र: महालक्ष्मीचे रूप.
उत्तर चरित्र: महासरस्वतीचे रूप. असे आहे. असे सांगत
साधनेचा अर्थ असा आहे की,
हा पाठ साधकाच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक संतुलन निर्माण करतो.
नकारात्मक शक्तींचा नाश करून सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करतो.साधनेत अडथळे दूर करण्यासाठी आणि विजय प्राप्त करण्यासाठी दुर्गासप्तशतीचा अभ्यास केला जातो.
कुंभमेळ्याच्या पर्वावर दुर्गासप्तशती पठण केल्याने तीर्थस्नानाचे पुण्य अधिक वाढते.
दुर्गा देवीची कृपा प्राप्त होते आणि भक्तांचे सर्व संकट दूर होतात. असे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी यावेळी सांगितले.
शिवगिरी महाराजां बद्दल सांगताना ते म्हणाले की,
शिवगिरी महाराज हिमालयातील साधना परंपरेचे पालन करणारे महान साधक आहेत. त्यांच्या मते दुर्गासप्तशती पठण हा केवळ पाठ नसून एक आध्यात्मिक ऊर्जा आहे, जी साधकाला देवीशी जोडते.
पाठाच्या दरम्यान केलेल्या ध्यानामुळे मनाला शांती आणि प्रचिती मिळते.हिमालयातील ऋषी-मुनींनी या पठणाला विशेष स्थान दिले आहे.जर आपण कुंभमेळ्याच्या सातव्या दिवशी दुर्गासप्तशतीचा पाठ नित्याचा आहे .शिवगिरी महाराजांसोबत हा पाठ आमच्या दृष्टीने एक अद्भुत अनुभव ठरला आहे. देवीची कृपा आणि कुंभमेळ्याचा पवित्र उत्सव यामुळे आध्यात्मिक जीवन अधिक आत्मा अनुभूतीपूर्वक आनंददायी झाला आहे. असे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments