लोहगाव (वार्ताहर) : प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात नुकताच ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
संकुलाचे प्राचार्य संजय ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी छात्रसेना प्रमुख दीपक धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयातील छात्रसैनिकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन ध्वजसंचलन केले. याप्रसंगी अश्विनी सोहोनी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. या सोहळ्यास मुख्याध्यापक सुभाष भुसाळ, उपप्राचार्य अलका आहेर, शिवप्रसाद जंगम, कुमारी रक्टे, माधुरी वडघुले, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शरद दुधाट, रेणुका वर्पे, संगीता उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अमन शेख, राधिका पेंढारे, सायली थोरात आणि कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गीत गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. शेवटी शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
0 Comments