टाकळीभान -प्रतिनिधी - टाकळीभान येथील लाभार्थ्यांना शासकीय घरकुलाचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या नियम व अटी पाहूनच घरकुलाचा लाभ घेता येईल असे प्रतिपादन उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी केले.
26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत समोर ग्रामसभा घेण्यात आली त्यावेळी खंडागळे म्हणाले की, घरकुल मंजूर होण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे घरकुल बांधण्याकरिता जागेची मोठी अडचण असून शासकीय जागेत घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्याला देता येत नाही, त्यासाठी स्वतःची जागा अथवा शेती नावावर असणे गरजेचे असून तेव्हाच त्याला घरकुलाचा लाभ मिळेल. लाभार्थ्याला वाटते. ग्रामपंचायतच्या जागेवर आहे त्या ठिकाणी घरकुल मिळावे अशी अपेक्षा असते,परंतु टाकळीभान ग्रामपंचायतकडे सर्व गट फॉरेस्ट या नावाने वर्ग असल्याने त्या जागेवर घरकुलाचा लाभ मिळत नाही. याचे सर्वाधिकार केंद्राला असल्याने फॉरेस्ट शेरे कमी करून गावठाणाकडे वर्ग होतील तेव्हाच घरकुलाचा प्रस्ताव मार्गी लागेल. तसेच रमाई आवास योजना व शबरी योजनेसाठी, ब' किंवा ड ' यादीत नाव असो अगर नसो ज्यांच्याकडे जातीचा दाखला गावठाण जागा अगर शेती नावावर असेल अशा दोन्ही घटकांना तात्काळ घरकुल मंजूर होते. तसेच लाभार्थ्यांना घरकुल मिळून तीस वर्षे पूर्ण झाली असेल तरी त्यांना पुन्हा घरकुलाचा लाभ घेता येतो त्यासाठी वरील कागदपत्र आवश्यक आहेत. टाकळीभान परिसरातील गाव मध्ये जे घरकुल झाले ते अनधिकृत असून संबंधित ग्रामसेवकांना चौकशीला सामोरे जावे लागेल,
भाजपाचे नारायण काळे म्हणाले की, टाकळीभान ग्रा प निकाल 16/1 असा असूनही विकास कामाला खिळ बसली आहे त्यामध्ये प्राथमिक केंद्र, रेशनिंग दुकान, स्ट्रीट लाईट, सार्वजनिक बस स्टॅन्ड, आदि बिकट प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. आपल्या गावात बाहेर गावाच्या व्यवसायिकांना परवाना देताना ग्रामपंचायतची परवानगी घेणे आवश्यक आहे तसेच टाकळीभानच्या बाजारपेठेला उतरती कळा आली असून याचे एकमेव कारण टाकळीभान परिसरातील अंतर्गत रस्त्यांची बिकट अवस्था हे एकमेव कारण आहे. व्यवसाय कडे वळा व्यवसाय हाच तुमच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे असेही काळे म्हणाले.
यावेळी, ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव ग्रामस्थांच्या सूचनांना उत्तर देताना म्हणाले की, आपण ज्या ज्या सूचना मांडल्या त्या आठ दिवसाच्या आत सोडवल्या जातील व जे बेघर असतील त्यांनी स्वतःच्या जागेचा व शेतीचा उतारा आणून त्यांना तात्काळ घरकुल मंजूर केले जाईल.स्टॅन्ड परिसरात सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, वाढदिवस राजकीय पदी निवड आदी फ्लेक्स बोर्ड लावताना ग्रा.प. परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जाधव यांनी सांगितले
याप्रसंगी अनिल बोडखे, कामगार तलाठी रूपाली, भाऊसाहेब बनकर सर, रामटेके पंजाब रणनवरे, प्रभाकर रणनवरे, शिंदे,आदींनी आपल्या समस्या मांडल्या.
यावेळी शिवाजी पवार, जयकर मगर सर, कविता रणनवरे, गोरख दाभाडे भाऊसाहेब पटारे, अशोक कचे, सामाजिक कार्यकर्ते करीम भाई देशमुख,ऍड धनराज कोकणे, एकनाथ रणनवरे, शामराव खरात , अनिता तडके, विकास मगर, बालाजी पटारे, महिंद्रा संत आदी ग्रामस्थ उपस्थित होते
चौकट :- सत्ताधारी गटाचे व विरोधी गटाचे वरिष्ठ नेते मंडळी एकही हजर नसल्यामुळे ग्रामसभा एक पोर खेळ म्हणून घेण्यात आली. त्यामध्ये टाकळीभान चे प्रभावी नेतृत्व ज्यांच्याकडे पाहिले जाते ते माजी सभापती नानासाहेब पवार अशोक चे माजी चेअरमन ज्ञानदेव पाटील साळुंके, कारेगाव भागचे संचालक शिवाजीराव शिंदे, माजी सरपंच मंजाबापू थोरात, सोसायटीचे माजी चेअरमन मधु मामा कोकणे, माजी चेअरमन राहुल पटारे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, माजी उपसरपंच भारत सरपंच पदाच्या काळात आपली खुर्ची ग्रामसभागृहात मांडली ते उपसरपंच पारजी पटारे आणि त्यांना ज्या काळात सरपंचपद भेटले नाही असे दत्तात्रय मगर ग्रा. प. सदस्य मयूर पटारे, विलास दाभाडे आदींनी ग्रामसभेला दांडी मारल्यामुळे आपल्या समस्याचं निराकरण होईल का नाही? याकडे ग्रामस्थांमध्ये दक्क्या आवाजात बोलले जात होते.
0 Comments