दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.26 - येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या विद्यार्थ्यांनी पंचायत समिती सोयगाव व महाविद्यालय परिसर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मतदार जनजागृती अभियानांतर्गत पथनाट्य सादर केले. या पथनाट्यमध्ये मतदार नाव नोंदणी, व्हीव्हीपॅट, कर्तव्यदक्ष नागरिक व आर्थिक प्रलोभणाला बळी न पडणे यासारख्या विषयवार नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. या पथनाट्याची संहिता लेखन, संवाद प्रा. स्वाती देशमुख यांनी केले.
विद्यार्थ्यांना पथनाट्य सादर करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रंगनाथनाना काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, कनिष्ठ विभागप्रमुख डॉ उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पथनाट्यासाठी डॉ. एस एल पाटील, श्री. टी आर शेख, ए टी मानकर, आर टी जाधव बी ए पाटील, स्वाती देशमुख, अश्विनी काळे व इतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
पथनाट्य पाहण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी वर्ग, गावातील नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments