सावळीविहीर बुद्रुक येथील साहेबराव बाबुराव जपे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन!

शिर्डी ( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव बाबुराव जपे पा.यांचे नुकतेच वयाच्या 68 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

 त्यांचा अंत्यविधी सावळीविहीर बुद्रुक येथील अमरधाम मध्ये मोठ्या शोकाकुल वातावरणात करण्यात आला. ते अहिल्यानगर येथे प्रसिद्ध व्यावसायिकही होते.

 त्याचप्रमाणे ते प्रगतशील शेतकरीही होते. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सावळीविहीर व परिसरात मोठे दुःख व्यक्त होत आहे.व  त्यांना सर्व क्षेत्रांमधून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments