दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.17 -- देशभर जानेवारी महिन्यात भारतीय आकाश पतंगांनी भरलेलं असते. बऱ्याच शाळा, संस्था, मंडळ, पतंग महोत्सव - काईट फेस्टिवल आयोजित करतात. मुळात पतंग ही फटाक्याप्रमाणे चीनची परंपरा आहे. चीन मध्ये त्यास" झेन "म्हणतात. पतंग ही भारतीय संस्कृती नाही त्यामुळे त्याचे उदात्तीकरण नको असे आवाहन आज देशभरातील पर्यावरण प्रेमी करत आहेत.
पतंगाच्या मांज्यात अडकून देशात लाखो पक्षी जखमी होतात, मरतात. अनेक माणसांचा गळा चिरून बळी गेला आहे. जखमी होण्याच्या हजारो घटना रोज घडतं आहेत.छतावरून पडून अनेक मुलं मृत्युमुखी पडलेत.भारतात चायनीज म्हणजेच नायलॉन मांजा विकणे प्रतिबंधित आहे, तरी तो सर्रास विकला जातो. काचेचा मांजा, धातूचा चुरा लावलेला मांजा ही बाजारात उपलब्ध आहे.मेटल कोटेड मांजाचा विद्युत तारांना स्पर्श होऊन अनेक लहान मुलांचा बळी ही गेला आहे.
याबाबत अभिनव प्रतिष्ठानचे वन्यजीव व वृक्ष संवर्धक डॉ. संतोष पाटील हे पक्षी वैभव टिकून रहावे म्हणून दरवर्षी विविध शाळांमध्ये जाऊन वनजागर या प्रबोधक उपक्रमातुन 10 दिवसांपासुन जनजागृती करत आहेत व आजही शहरातील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रबोधन करून मुलांनी पतंग न उडवण्याची शपथ घेतली. अनेक विद्यार्थी पतंगबाजी करत नाही.याबाबतची फ्रेमही शाळेस भेट दिली. पालोदवाडी , बहुली,सह अनेक शाळांनी हा उपक्रम राबविला.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव टी.दौड, गणेश चव्हाण, सोनवणे सर, फरकाडे सर, सपाटे, मगर सर , राजपूत सर श्रीमती काळे, श्रीमती तायडे, सावंत सर आदीसह सर्व शिक्षकांची उपस्थिती होती.
--पक्षांच्या आयुष्याची दोरि तुटता तुटता वाचली -- दरवर्षी प्रमाणे यावेळी ही डॉ. पाटील यांनी 16 पक्षी पतंगाच्या दोऱ्याने जायबंदी झालेल्या पक्ष्यांना वाचविले आहेत. कोणताही दोरा हा पक्षांना घातक असतो कारण पक्षी गतिमान असतात त्यामुळे साधा दोरा ही जीवघेणा असतो. जखमी पक्षी जमिनीवर पडला की कुत्रे त्यास ठार करतात असे अनेकदा बघितले आहे.
डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान,वन्यजीव संवर्धक, सिल्लोड.
--काळजी घ्या पाखरांची -पतंग उडवण्याची वेळ एकतर सकाळी असते व संध्याकाळी असते. सकाळी पक्षी अन्नाच्या शोधात बाहेर पडत असतात तर संध्याकाळी ते घराकडे परतत असतात. याच वेळेस पक्षी पतंगात अधिक अडकतात.
--- प्लास्टिक पतंग - पर्यावरनाची हानी - सद्या प्लास्टिकचे पतंग उडवण्याचा ट्रेंड आलाय. प्लास्टिक हे कधी ही नष्ट होत नाही.पृथ्वीवर आधीच खुप मोठा प्लास्टिक कचरा आहे त्यात ही पतंगाची भर पडत आहे.
0 Comments