दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.17-- सोयगाव नगरपंचायत अंतर्गत शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका दुर्गा बहुउद्देशीय संस्था-सिल्लोड यांना देण्यात आलेला आहे.या कामासाठी ठेकेदाराला दरमहा सहा लाख 96 हजार रुपये (696000) देण्यात येतात.परंतु या ठेकेदाराने सफाई कामगारांचे दोन-तीन महिन्याचा पगार (वेतन) दिलेला नाही.
परिणामी सफाई कामगारांनी संप सुरू केलेला आहे.त्यामुळे शहरातील चौका-चौकात नाल्यामध्ये कचरा साचलेला आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सोयगाव शहरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे घनकचरा व्यवस्थापकाचा ठेका रद्द करून चौकशी करण्यात यावी.तसेच यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शहरात सुरू असलेली नगरपंचायतीची सक्तीची वसुली थांबण्यात यावी. व बसस्थानक परिसरातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या च्या जागे समोरील गटारीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.
ते काम त्वरित पूर्ण करण्यात यावे नसता आंदोलन करण्यात येईल असे तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस वसंत बनकर, माजी नगराध्यक्ष कैलास काळे , सुनील गावंडे, भाजप शहराध्यक्ष योगेश पाटील, माजी नगरसेवक संजय मोरे, संजय तायडे,मयूर मनगटे,प्रमोद पाटील, समाजसेवक मंगेश सोहनी,सुनील ठोंबरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments