नाशिकच्या पंचवटीत रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने भव्य गंगा गोदावरी महाआरती श्री श्री रविशंकरजी यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न!आरती ही श्रद्धा व संत ज्ञानाची करा! पर्यावरणाचे रक्षण करा! नदीचा प्रवाह शुद्ध ठेवा-- श्री श्री रविशंकरजी

नाशिक ‌( राजकुमार गडकरी) भारतीय संस्कृती महान आहे. ती टिकून ठेवण्यासाठी राजाश्रयाची ही गरज आहे. असे सांगत.

गोदा आरतीचे भव्य स्वरूपातील हे केलेले आयोजन बघून कुंभमेळा आताच होत असल्यासारखे वाटते. आरतीत मोठ्या प्रमाणात भाविक त्यात विशेष म्हणजे महिलांचा सहभाग मोठा आहे. लहान थोर सर्व आहेत. त्यामुळेच भारतीय संस्कृती महान आहे. सनातन धर्म हा श्रेष्ठ असून तो धर्म टिकवून ठेवण्यासाठी परिश्रम महत्त्वाचा आहे व ते केल्यामुळेच तो टिकून आहे, असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी केले.
नाशिक येथे पंचवटी मध्ये रामकुंडावर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे करण्यात आलेल्या महा गोदा आरतीस आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांची प्रमुख उपस्थिती होती.  त्यांनी गंगा गोदावरी पूजन केले. गंगा गोदावरी आरती नंतर मार्गदर्शन करताना गुरुदेव श्री श्री रविशंकर जी म्हणाले, प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणात भरलेल्या महाकुंभाची व्यवस्था बघून सर्व दुनिया आश्चर्यचकित होत आहे. प्रभूच्या श्रद्धेमुळे शक्य होत आहे. आरती ही श्रद्धा व संत ज्ञानाची करा, पर्यावरणाचे संरक्षण करा. नदीचा प्रवाह शुद्ध ठेवणे हे आपले कर्तृत्व आहे, प्रत्येक व्यक्तीने पाच वृक्ष लावले पाहिजे, जल, मंत्र आणि प्राणायनाने  शुद्धीकरण होते. चिंतामुक्त व्हा, असे सांगितले.
गुरुदेवांचे आगमन झाल्यानंतर महिलांनी गुरुदेवांचे प्रथम भव्य व्यासपीठावर औक्षण केले, नंतर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने  श्री श्री रविशंकर जी यांचा सत्कार करून त्यांना चांदीचे अभिवादन पत्र प्रदान करण्यात आले. नंतर समस्त राष्ट्राच्या कल्याणाची प्रार्थना करण्यात आली. गोदावरीचे ध्यान व पूजन करण्यात आले. त्यानंतर जय देवी सूरसरिते गोदावरी माता हे आरतीचे सूर गुंजले.
महाआरतीच्या अगोदर झालेल्या सत्संगात अंबे जगदंबे, जगदंबे जय अंबे, भोले की जय जय, शिवजी की जय जय पार्वती पती शिवजी की जय जय, जय शिवशंकर हर हर शंकर आदी भजन सादर झाली. गुरुदेवांच्या हस्ते रामतीर्थ सेवा समितीच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. या महाआरतीच्या वेळी भव्य व्यासपीठ ,आकर्षक विद्युत रोषणाई ,व भव्य दिव्य असे महारथी साठी छोटे छोटे व्यासपीठ निर्माण करण्यात आले होते व तेथे पूजा आरती करण्यात येत होती.या पवित्र गोदावरी नदीच्या दोन्ही तीरावर महा आरती साठी हजारो भाविक आरतीसाठी उपस्थित होते. सध्या प्रयागराज येथे महा कुंभमेळा सुरू झाला आहे 13 व 14 जानेवारीला शाही स्नान झाले आहे. आणि 15 जानेवारीला नाशिक पंचवटी मध्ये गोदावरी महाआरतीला श्री श्री रविशंकरजी उपस्थित होते. हा मोठा योग असल्याने मोठ्या संख्येने भाविक आरतीसाठी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments