दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि. 16-- अनधिकृत वीज चोरी करून वीज वापरणाऱ्या आठ ग्राहकांवर सोयगाव महावितरण कार्यालयाकडून दि.16 गुरुवारी विद्युत चोरांवर कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीमुळे अनधिकृत वीज चोरी करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे. मात्र शहरासह परिसरात व तालुक्यात शासकीय इमारतींचे बांधकाम सुरू आहे.गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम ठेकेदारांकडून अनधिकृत वीज चोरी करून वापर सुरू होता काहींनी नंतर परवानगी घेतल्याचे समजते परंतु अनधिकृत वीज चोरी करणाऱ्या ठेकेदारांवर कोण कार्यवाही करणार असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
सोयगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजकुमार खिंडरे, सोयगाव कक्ष अभियंता मोईज पठाण, सोयगाव कक्षातील जनार्दन जोहरे व विष्णू लाड यांनी सोयगावसह आमखेडा भागातील आकडे टाकून अनधिकृत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांवर विरुद्ध मोहीम राबवली या मोहिमेमध्ये आठ आकडेबहादरांवर कार्यवाही करून त्यांचा घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. सर्व आकडेबहादरांना महावितरण तर्फे दंडाचे बिल देण्यात येणार असून ते वसूल करण्यात येणार आहे. अनधिकृत वापर चोरी करून वापर करणाऱ्या मध्ये या कार्यवाही मुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महावितरण तर्फे महावितरण अभय योजना राबवल्या जात असून सदर योजनेअंतर्गत ज्या ग्राहकांचे कायमस्वरूपी वीज मीटर काढून नेण्यात आले आहे. त्या ग्राहकांना परत मीटर घेण्यासाठी घवघवीत सूट देण्यात येणार असून सदर योजनेची जाहिरात सोयगाव उप विभागामार्फत करण्यात येत आहे. शासकीय इमारतींचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांकडून अनधिकृत वीज चोरीचा वापर केला जात असून त्यांच्यावर कोण कार्यवाही करणार हे मात्र निरुत्तरीत आहे.
0 Comments