डिजिटल साक्षरतेसह मूळ मानवी कौशल्य महत्त्वाचे - मा. प्रकाश काळे


संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराला सुरुवात

दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.16 -- आजच्या काळात डिजिटल साक्षरता महत्त्वाची आहे. त्यासोबत मानवाचे वाचन, लेखन, मनन यासारखे मूळ कौशल्य ही महत्त्वाचे आहेत. आज आपण डिजिटल साक्षर होण्यासाठी प्रयत्न करत आहोत परंतु मानवी मूळ कौशल्य विसरत आहोत. यामुळे आपणास अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. असे मत अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव मा प्रकाश काळे यांनी व्यक्त केले. ते संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. 
     यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, माळेगाव पिंपरी येथील सरपंच सौ साधनाताई राजपूत, उपसरपंच सौ सुनीताताई जाधव, श्री शिवराम जाधव, श्री रवींद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
     डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२५ दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम शिबीर माळेगाव येथे आयोजित केले आहे. शिबिरामध्ये पुढील सात दिवस विविध वक्त्यांचे बौद्धिक सत्र, श्रमदान, आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.
     उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ पंकज गावित यांनी तर सूत्रसंचालन डॉ निलेश गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ प्रदिप गोल्हारे यांनी मानले.
     या शिबिरासाठी गजानन क्षीरसागर, कृष्णा राठोड, आकाश गव्हाड, वैभव ढगे, प्रीती काळे, वैष्णवी एलिस, दिप्ती सोनवणे, पूजा जाधव, शामल उंबरकर आदी विद्यार्थी स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.
    उद्घाटन कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी स्वयंमसेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments