सोयगाव दि.30 सोयगाव शहरातील कला विष्णू मापारी,दत्तू रोकडे, डिगांबर वाघ,अरुण सोहनी, कवी माणिक सोनवणे यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल त्यांना केलेल्या जळगाव, नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
त्यांच्या कार्याची दखल घेत सोयगाव, शेंदूरणी येथील सामजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध व्यापारी तथा स्वामी समर्थ पतसंस्थेचे उपाध्यक्ष विष्णु दुसाने व समाजसेवक गोपाल दुसाने यांनी लक्ष्मी अलंकार शेंदूरणी येथील शोरूम मध्ये विष्णू मापारी,दत्तू रोकडे,डिगांबर वाघ,अरुण सोहनी व कवी माणिक सोनवणे यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व चांदीची लक्ष्मी मूर्ती भेट देऊन सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी लक्ष्मी अलंकार चे संचालक ऋषी दुसाने, भगवान वाघ उपस्थित होते.
0 Comments