शिर्डी (प्रतिनिधी)
गुप्त नवरात्रीचे व्रत व दुसरे दिवसाचा सप्तशती पाठ भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या पवित्र व्रताच्या आरंभापासूनच संकल्पबद्ध होऊन देवीच्या कृपेची अनुभूती येत आहे .आजच्या दिवशी सप्तशती पाठाचे अत्यंत श्रद्धेने पठण केल्यास त्याची फल अनुभूती मिळाल्याशिवाय राहत नाही असे मत महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
सप्तशती पाठाचे महत्त्व मोठे आहे.देवी महात्म्य म्हणून ओळखली जाणारी श्रीदुर्गा सप्तशती ही 700 श्लोकांची अद्भुत रचना आहे, जी देवीच्या महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तिन्ही रूपांचे महत्त्व सांगते. या पाठाद्वारे साधकांमध्ये आत्मिक ऊर्जा निर्माण होते, आणि गुप्त नवरात्रीच्या विशेष काळात याचे पठण अत्यंत फलदायी मानले जाते.हा पाठ आणि त्याचा प्रभाव
आजच्या पठणात सप्तशतीतील मध्यम चरित्र (महालक्ष्मी चरित्र) विशेष भक्तिभावाने पठण केले गेले. या चरित्रात महिषासुर वधाचा उल्लेख आहे, जो तमोगुणावर सत्वगुणाच्या विजयाचे प्रतीक आहे. पठणादरम्यान वातावरण अत्यंत भक्तिरसाने भारले गेले. मनोभावे पाठ करताना साधकांनी देवीच्या कृपेचा अनुभव घेतला आहे.
गुप्त नवरात्रीतील विशेषता अशी आहे की,गुप्त नवरात्रीमध्ये साधना अत्यंत गुप्तपणे केली जाते, त्यामुळे साधकाला अधिक अंतर्मुख होण्याची संधी मिळते. सप्तशती पठणाने मंत्रशक्तीचा जागर होतो, आणि आध्यात्मिक स्तरावर देवीची अनुकंपा साधकाला प्राप्त होते.आजच्या दिवशी, सप्तशतीच्या पठणातून निर्माण झालेली शक्ती भक्तांना त्यांच्या व्रताचा दृढ संकल्प पूर्ण करण्यास प्रेरित करणारी ठरली. उद्याच्या दिवशी अधिक उर्जेने साधना करण्याचा संकल्प करत, आजचा दिवस देवीचरणी समर्पित करण्यात आला. रेल्वेच्या प्रवासातही शांततेत हा पाठ करण्यात आला. असे श्री नर्मदेश्वर सेवाधामचे राजराजेश्वरी महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगत प्रयागराज महाकुंभमेळा हा एक दिव्यशक्ती अध्यात्म शक्ती अनुभवण्याचा एक धार्मिक मोठा सोहळा आहे. या महा कुंभमेळ्यात सुमारे दहा दिवस राहून मोठी आत्मिक शांती समाधान, अनुभूती मिळाली. अनेक साधुसंत महंत ऋषी यांचे आध्यात्मिक ज्ञान आशीर्वाद प्राप्त झाले. मौनी अमावस्या च्या शाही स्नान मधला पवित्र त्रिवेणी संगम स्नानाचा आनंद मोठा अलौकिक असा होता. असे सांगत येथे भक्त गणेशभाऊ उगले पाटील आणि धर्मवीर छावा संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सेवेकरी बंधू अहोरात्र सेवा करत आहेत, परिश्रम घेत आहेत.
तसेच महाकुंभ मेळ्यातील सत्संग सोहळ्यात आपल्या सहभागाबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद आहे. कुंभ यात्रेकरूंच्या सेवेसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दलही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आहे. आपली निःस्वार्थ सेवा आणि समर्पण हे निश्चितच ईश्वरी कृपेचे फळ आहे. आपण भविष्यातही असाच भक्तिमार्गात पुढे वाटचाल करत रहाल, हीच शुभेच्छा असून
आपल्या पवित्र सेवेवर महादेवाची कृपा सदैव राहो असे श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे. दरम्यान महंत आत्माराम गिरीजी महाराज यांचे प्रयागराज येथे सुमारे दहा दिवस वास्तव्य होऊन व मौनी अमावस्या चे शाही स्नान करून ते 31 जानेवारी 2025 रोजी सकाळी श्री नर्मदेश्वर सेवा धामला आले आहेत. त्यांचे स्वागत व त्यांचे शुभ आशीर्वाद साधक घेऊन धन्य धन्य होत आहेत.
0 Comments