दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.27 - एस.टी.ने केलेल्या भाडेवाढीच्या निषेधार्थ शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख दिलीप मचे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोयगाव बसस्थानकासमोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी तास भर वाहतूक ठप्प झाली होती. चक्का जाम आंदोलना दरम्यान महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.भाडेवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी या आशयाचे निवेदन नायब तहसिलदार बहुरे यांना देण्यात आले.
या चक्का जाम आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र काळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष (एसपी) इंद्रजित सोळंके, शहराध्यक्ष रवींद्र काळे, दिनेश हजारी,रवींद्र काटोले,गुलाबराव कोलते,शाखाप्रमुख गणेश कापरे,अजय नेरपगारे,धोंडू बावस्कर, कलीम पठाण आदी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सपोनि पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पवार,रवींद्र तायडे,प्रवीण देवरे,पवन तायडे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments