शिर्डी (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर बु विद्यालयात सोनवार दि.27 जानेवारी 2025 रोजी गांधी विचार संस्कार परीक्षेचे बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.तुपे सर यांच्या मार्गदर्शनाने सन 2024-25 यावर्षी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी ते नववी अखेर गांधी विचार परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. जमधडे अवंतिका नितीन ही गांधी विचार संस्कार परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली . तिला गांधी विचार संस्कार परीक्षेमार्फत मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यालयातून या परीक्षेत 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जपे पाटील तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तुपे सर व सर्व शिक्षक यांनी सर्व यशस्वी
विद्यार्थ्यांचेअभिनंदन केले.यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री डुंबरे सर, गांधी विचार संस्कार परीक्षेच्या विभाग प्रमुख सौ भामरे मॅडम तसेच विद्यालयातील शिक्षक श्री म्हस्के सर, श्री खेडकर सर, श्री काळेगोरे सर, श्री खान सर, श्री वाकचौरे सर, सौ डहाळे मॅडम, श्रीम.कानडे मॅडम व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments