सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमी कार्यरत असणारे, खंडकरी व सरपंच परिषदेचे नेतृत्व आणि सर्व परिचित व लोकप्रिय व्यक्तिमत्व ---बाळासाहेब जनार्दन जपे पा.

शिर्डी( राजकुमार गडकरी)
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील तरुण व धडाडीचे नेते बाळासाहेब जनार्दन जपे  पा.यांचा आज 30 जानेवारी गुरुवार रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर फोन द्वारे, सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  बाळासाहेब जनार्दन जपे पा. हे राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा., जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पा‌ तसेच युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रात कार्यरत असून ते सध्या अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत.
सावळीविहीर बुद्रुक येथे शालेय शिक्षण झाल्यानंतर कोपरगाव के जे सोमय्या महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले . महाविद्यालयात असतानाच त्यांनी त्या काळी महाविद्यालयात निवडणूक लढवून ते ज्युनियर जनरल सेक्रेटरी झाले होते. तेव्हापासूनच त्यांना राजकीय क्षेत्राची आवड निर्माण झाली व तेथून त्यांचा राजकीय क्षेत्रातला प्रवास सुरू झाला. त्यानंतर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही काम करत होते. हे काम करत असताना गावातही त्यांनी सामाजिक कार्याकडे लक्ष दिले.व सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायत लढवली. पहिल्यावेळी ते पराभूत झाले मात्र नंतर त्यांनी आणखी गावात जोमाने समाजकार्य करून ते ग्रामपंचायत सदस्य झाले. ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक होऊन त्यांनी सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच पद तसेच सोसायटीचे चेअरमन पदही भूषवले आहे. त्यानंतर राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून त्यांनी चांगले काम केले व त्याची दखल घेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती केले होते .राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदावर असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा तसेच लोणीच्या बुधवारच्या जनावरांच्या बाजारातही चांगले काम करून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला अधिक उत्पन्न मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला व त्याला यशही आले .अश्या राजकीय क्षेत्रात एक एक पायरी वर चढत ते आज अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषदेचे राज्य उपाध्यक्ष आहेत. राजकीय क्षेत्रा बरोबरच सामाजिक ,शैक्षणिक, धार्मिक आदी क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर बुद्रुक या विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांचा हिरारीने नेहमी सहभाग असतो. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती असो की विद्यालयात कोणताही कार्यक्रम असो त्याला आवर्जून त्यांची उपस्थिती तसेच कार्यक्रमाला त्यांचे मोठे सहकार्य असते. त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्रातही  त्यांचे मोठे कार्य आहे. श्री परशुराम महाराज यात्रा असो की श्री साई सच्चरित्र पारायण असो, किंवा गावात गणेशोत्सव, नवरात्र उत्सव असो, या सर्व धार्मिक गोष्टींमध्ये त्यांचे मोठे योगदान असते. सामाजिक क्षेत्रातही ते सक्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती किंवा सावित्रीबाई फुले, महात्मा फुले जयंती ,पुण्यतिथी आदी कार्यक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. महाराष्ट्र राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नातही त्यांनी मोठे काम केले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी ते अ.भा. सरपंच महासंघ परिषदेच्या वतीने सातत्याने प्रयत्नशील आहेत.
अशा सर्व क्षेत्रात कार्यरत असताना, आपल्या कामात व्यस्त असताना गावातील तसेच नातलग, मित्रपरिवार यांच्या सुखदुःखात वेळ काढून ते सहभागी होणारे , सर्वांमध्ये मिसळणारे नेते आहेत. या सर्व क्षेत्रांमध्ये काम करत असताना ते एक प्रगतीशील शेतकरी आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी त्यांचा चांगला संपर्क व परिचय आहे.त्याचप्रमाणे ग्राउंड लेव्हलला गोरगरिबांशीही त्यांचा संपर्क  आहे .त्यामुळेच ते गावातच नव्हे तर तालुक्यातील एक सर्वपरिचित व लोकप्रिय असे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. अशा लोकप्रिय व सर्व परिचित असणाऱ्या स्पष्ट वकृत्व, धाडसी नेतृत्व , प्रामाणिक कर्तुत्व व  सुस्वभावी व्यक्तिमत्व असणाऱ्या बाळासाहेब जनार्धन जपे पा. यांना सर्वच आपुलकीने काका म्हणून संबोधतात. असे सर्वांशी मिळून मिसळून वागणारे काका उर्फ बाळासाहेब जपे  पा.यांचा आज वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त त्यांचे सर्व क्षेत्रांमधून अभिष्टचिंतन होत आहे. दैनिक छत्रपती एक्सप्रेस च्या वतीनेही त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आहेत.


Post a Comment

0 Comments